

Buffalo Hit Bullet Bike Rider : मृत्यू कोणाला कधी खेचून आणेल याची आपल्यापैकी कोणालाच कल्पना नाही. आपण कधी कोणत्या अपघाताचे बळी ठरू याचा अंदाजही कोणी लावू शकत नाही. एक अतिशय हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बुलेटच्या फटाक्यासारख्या आवाजामुळे म्हैस भडकते आणि बुलेट चालकाच्या जीवाला धोका निर्माण होतो. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका महिलेसमोर एक म्हैस धावताना दिसत आहे.
म्हैस रस्त्यानं चालत असताना समोरून एक तरुण बुलेट बाईकवरून येतो. या बुलेट बाइकचा आवाज खूप मोठा आहे. ही व्यक्ती बाईकसह म्हशीजवळ पोहोचताच मोठा आवाज झाल्यानं म्हैस संतप्त होते आणि दुचाकीस्वाराला धडक देते. म्हशीने धडक देताच तो तरुण खाली पडतो. व्हिडिओमध्ये तो माणूस वेदनेनं ओरडताना दिसतो. थोड्या वेळानं काही लोक तिथे जमलेले दिसतात. म्हशीच्या धडकेनं माणूस जबर जखमी होतो. मात्र, ही घटना कुठे घडली आणि आता त्या तरुणाची प्रकृती कशी आहे, याबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही.
बुलेट की पटाखा जैसी आवाज से भैंस भड़क गई और बुलेट चालक के लिए जान का खतरा बन गई. देखिए वायरल वीडियो😱 pic.twitter.com/bYPnGBScpP
— Shubham Rai (@shubhamrai80) September 18, 2022
हेही वाचा – VIDEO : आता आकाशात धूम मचाले..! जगातील पहिली हवेत उडणारी बाईक आलीय; किंमत आहे ‘इतकी’
वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांसाठी ही घटना धडा आहे. बाईकच्या मोठ्या आवाजाबाबत पोलीसही कडक कारवाई करतात, तरीही काही लोक आपली चूक मान्य करत नाहीत.