

E-Passport India : भारताने डिजिटल क्रांतीच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आता पासपोर्टदेखील डिजिटल होत असून, परराष्ट्र मंत्रालयाने ई-पासपोर्ट सुरू केला आहे. एप्रिल 2024 पासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेली ही योजना आता देशभर जून 2025 पासून अधिकृतपणे लागू करण्यात आली आहे.
ई-पासपोर्ट म्हणजे नेमकं काय?
ई-पासपोर्ट दिसायला पारंपरिक पासपोर्टसारखाच असतो, पण यामध्ये RFID चिप व अँटेना बसवलेला असतो. यामध्ये धारकाची बायोमेट्रिक माहिती – फिंगरप्रिंट, डिजिटल फोटो सुरक्षित स्वरूपात संग्रहित केली जाते. त्यामुळे खोटा पासपोर्ट बनवणं जवळजवळ अशक्य होतं.
याच्या कव्हरवर “Passport” शब्दाखाली सोन्याच्या रंगाचा खास चिन्ह असतो, ज्यावरून त्याची ओळख पटते. हे पासपोर्ट ICAO (International Civil Aviation Organization) च्या मानकांनुसार तयार करण्यात आले आहे, त्यामुळे जगभरात त्याची मान्यता आहे.
हेही वाचा – टीम इंडियाची जर्सी कोणत्या कपड्याने बनते? जर्सीत घाम का लागत नाही? जाणून घ्या…
कोणाला आणि कुठे मिळेल ई-पासपोर्ट?
सुरुवातीला ही सुविधा चेन्नई, हैदराबाद, नागपूर, गोवा, जम्मू, जयपूर, दिल्ली अशा काही निवडक केंद्रांपुरती मर्यादित होती. परंतु आता ‘पासपोर्ट सेवा प्रोग्रॅम 2.0’ अंतर्गत ती हळूहळू देशभर लागू केली जात आहे.
तरीही, सर्व केंद्रांवर ही सुविधा एकदम उपलब्ध होणार नाही. नागरिक ई-पासपोर्टसाठी अर्ज करू शकतात. मात्र, ज्यांच्याकडे सध्या वैध पासपोर्ट आहे, त्यांना तातडीने बदलण्याची गरज नाही.
कसं कराल ई-पासपोर्टसाठी अर्ज?
ई-पासपोर्ट मिळवण्यासाठी प्रक्रिया अगदी सोपी आहे:
- passportindia.gov.in या अधिकृत पोर्टलवर रजिस्ट्रेशन/लॉगिन करा.
- अर्ज फॉर्म भरा व जवळचं पासपोर्ट सेवा केंद्र निवडा.
- ऑनलाइन फी भरून अपॉईंटमेंट बुक करा.
- अपॉईंटमेंटच्या दिवशी आवश्यक कागदपत्रांसह केंद्रात जा.
- बायोमेट्रिक वेरिफिकेशननंतर पासपोर्ट तयार होईल.
ई-पासपोर्टचे महत्त्वाचे फायदे
जास्त सुरक्षितता: चिपमध्ये संग्रहित माहिती बनावट करणे कठीण.
फास्ट इमिग्रेशन: आंतरराष्ट्रीय विमानतळांवर चेकिंगची प्रक्रिया वेगवान होईल.
जागतिक मान्यता: ICAO प्रमाणित असल्याने जगभर ओळख मिळते.
ओळखीची सुरक्षितता: बायोमेट्रिक व इलेक्ट्रॉनिक संरक्षणामुळे identity theft कमी होईल.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा