

62 Steel Spoons In The Stomach : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीच्या पोटातून ६२ स्टीलचे चमचे काढण्यात आले आहेत. त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ही व्यक्ती एक वर्षभर चमचे खात होता. डॉ राकेश खुराना यांनी एनआयला सांगितले, की विजय नावाच्या ३२ वर्षीय रुग्णाला विचारण्यात आले, की त्याने हे चमचे खाल्ले आहेत का? तर रुग्णाने सांगितले की हो त्याने स्वतः हे चमचे खाल्ले आहेत.
मुझफ्फरनगर मंदसौर भागातील ३२ वर्षीय विजयला पोटदुखीची तक्रार होती. वेदना वाढल्याने विजयला घरी डॉक्टरांकडे नेण्यात आले. प्रकृती चिंताजनक पाहून डॉक्टरांनी विजयला दाखल केले. प्रकृती बिघडल्यावर डॉक्टरांनी पोटावर शस्त्रक्रिया केली. ऑपरेशन दरम्यान रुग्णाच्या पोटात चमचा दिसल्याने डॉक्टर आश्चर्यचकित झाले. एक एक करून काढले. डॉक्टरांनी चमचे मोजले तेव्हा ६२ चम्मचांची संख्या सांगितली. ते वेगाने व्हायरल होत आहे. तो लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
हेही वाचा – संपलं सगळं..! जसप्रीत बुमराह टी-२० वर्ल्डकपमधून बाहेर; भारताला ‘मोठा’ धक्का!
UP | 62 spoons have been taken out from the stomach of 32-year-old patient, Vijay in Muzaffarnagar. We asked him if he ate those spoons & he agreed. Operation lasted for around 2 hours, he is currently in ICU. Patient has been eating spoons for 1 year: Dr Rakesh Khurrana (27.09) pic.twitter.com/tmqnfWJ2lY
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 28, 2022
विजयच्या पोटात अनेक स्टीलचे चमचे होते. मात्र, त्याचा पुढचा भाग गायब होता. डॉक्टरांनी एक एक करून त्याच्या पोटातून ६२ चमचे काढले. तब्बल ४ तास डॉक्टरांनी विजयवर शस्त्रक्रिया केली. डॉक्टरांनी या ऑपरेशनचा व्हिडिओही बनवला. ऑपरेशननंतरही विजयची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टरांनी सांगितले, की अशी केस आम्ही प्रथमच पाहिली आहे.
Watch: Doctors Remove 63 Steel Spoons From Man's Stomach In Uttar Pradesh
In a bizarre case, doctors in Uttar Pradesh's Muzaffarnagar found 63 steel spoons in a patient's stomach. The operation took place at a private hospital in Uttar Pradesh's Muzaffarnagar district.#UP pic.twitter.com/449mx79MGW
— The Logical Indian (@LogicalIndians) September 29, 2022
याप्रकरणी पुतण्या अखिल चौधरी याने सांगितले की, विजयला ड्रग्जचे व्यसन होते. व्यसनमुक्तीसाठी त्याला शहरातीलच व्यसनमुक्ती केंद्रात पाठवण्यात आले. तेथील कर्मचाऱ्यांनी विजयला जबरदस्तीने चमचे खाऊ घातल्याचा आरोप अखिलने केला आहे. घरी आल्यानंतर त्याने आम्हाला याबद्दल सांगितले नाही.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!