LPG Cylinder Price : होळीपूर्वी सर्वसामान्यांना झटका..! गॅस सिलिंडर ‘इतक्या’ रुपयांनी महागला; मुंबईतील दर आहे…

WhatsApp Group

LPG Cylinder Price : होळीच्या सणाआधीच सर्वसामान्यांना दणका मिळाला आहे. देशांतर्गत बाजारात बुधवारी सकाळी घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत ५० रुपयांनी वाढली आहे. सरकारी तेल कंपन्यांनीही व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ३५०.५० रुपयांची वाढ झाली आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या १४.२ किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीत आज ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत आता ११०३ रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी येथे १०५३ रुपयांना सिलिंडर मिळत होता. घरगुती सिलिंडरच्या दरात तब्बल ८ महिन्यांनंतर वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी ६ जुलै २०२२ रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली होती. मुंबईत एलपीजी सिलिंडर आता १०५२.५० रुपयांऐवजी ११०२.५ रुपयांना मिळणार आहे. कोलकात्यातही एलपीजी सिलिंडर १०७९ रुपयांवरून ११२९ रुपयांवर पोहोचला आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्ये १०६८.५० रुपयांऐवजी घरगुती गॅस सिलिंडर १११८.५ रुपयांना विकला जात आहे.

व्यावसायिक सिलेंडरनेही दिला दणका

सरकारी तेल कंपन्यांनीही १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ३५० रुपयांपेक्षा जास्त वाढ केली आहे. आता दिल्लीत १७६९ रुपयांऐवजी २११९.५० रुपयांना व्यावसायिक सिलिंडर मिळणार आहे. कोलकातामध्ये १८७० रुपयांना मिळणारा व्यावसायिक सिलिंडर आता २२२१.५० रुपयांना मिळणार आहे. मुंबईत आतापर्यंत १७२१ रुपयांना मिळणारा व्यावसायिक गॅस सिलिंडर आता २०७१.५० रुपयांना मिळणार आहे. चेन्नईमध्येही आतापर्यंत १९१७ रुपयांना मिळणारा व्यावसायिक गॅस सिलिंडर आता २२६८ रुपयांवर पोहोचला आहे.

हेही वाचा – फक्त ९० हजारात घरी आणा TATA ची ‘बेस्ट सेलिंग’ कार..! होतेय तुफान विक्री; जाणून घ्या माहिती

सरकारी तेल कंपन्यांनी 1 मार्चपासून नवीन दर लागू केले आहेत, परंतु यूपीमध्ये अद्याप स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. राजधानी लखनऊमध्ये १४.२ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत केवळ १०९०.५० रुपये आहे, तर नोएडामध्येही एलपीजी जुन्या दराने १०५०.५० रुपये आहे. मात्र, जयपूरमध्ये ११०६.५० रुपये, पटनामध्ये १२०१ रुपये, बंगळुरूमध्ये १११.५० रुपये आणि ११०५.५० रुपये वाढले आहेत.

जर आपण एलपीजी सिलेंडरच्या वापराबद्दल बोललो, तर त्याचा सर्वाधिक वापर स्वयंपाकघरात केला जातो. सरकारी तेल कंपन्यांच्या अहवालानुसार, २०२१-२२ मध्ये, ९० टक्के एलपीजीचा वापर स्वयंपाकघरात झाला होता, तर ८ टक्के औद्योगिक वापरासाठी होता. याशिवाय दोन टक्के एलपीजी सिलिंडरही वाहनांमध्ये वापरण्यात आले. उज्ज्वला योजनेंतर्गत, सरकार एका वर्षात सुमारे ८ कोटी लाभार्थ्यांना अनुदानावर १२ सिलिंडर पुरवते.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment