राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मूंना मिळणार ‘या’ सुविधा! मोफत बंगला, फोन आणि…

WhatsApp Group

मुंबई : द्रौपदी मुर्मू या देशाच्या नव्या राष्ट्रपती आहेत. २५ जुलै रोजी त्यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. मुर्मू या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत. शपथ घेतल्यानंतर त्यांना अनेक सुविधा मिळणार आहेत. राष्ट्रपती हा देशाचा पहिला नागरिक असतो. एवढेच नाही तर ते तिन्ही सशस्त्र दलांचे म्हणजे लष्कर, हवाई दल आणि नौसेनेचे सर्वोच्च अधिकारी असतात. संसदेनं मंजूर केलेले विधेयक राष्ट्रपतींनी मंजूर केल्यावरच कायदा बनू शकतो. याशिवाय संसदेचं पहिलं अधिवेशन राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंच सुरू होतं. भारतामध्ये राष्ट्रपतींना दिल्या जाणाऱ्या सुविधा जगातील इतर देशांतील राष्ट्रपतींना मिळणाऱ्या सुविधांपेक्षा अधिक आहे.

भारताच्या राष्ट्रपतींना किती वेतन मिळतं?

राष्ट्रपतींच्या वेतनाबद्दल बोलायचं झालं, तर त्यांना देशात सर्वात जास्त वेतन दिलं जातं. २०१७ पर्यंत, राष्ट्रपतींना १.५० लाख रुपये मासिक वेतन मिळत होते, जे वरिष्ठ नोकरशहाच्या पगारापेक्षा खूपच कमी होते. २०१७ या वर्षी ते दरमहा ५ लाख रुपये करण्यात आले. राष्ट्रपतींच्या पत्नीला दर महिन्याला सचिवीय सहाय्य म्हणून ३०,००० रुपये मिळतात.

राहण्यासाठी काय सुविधा आहेत?

राष्ट्रपती भवन हे भारताच्या राष्ट्रपतींचं अधिकृत निवासस्थान आहे. यामध्ये त्यांचं कार्यालयही आहे. सुमारे २ लाख स्क्वेअर फूट फ्लोअर एरिया असलेलं हे घर सर्व सुविधांनी सुसज्ज आहे. त्यात असलेली मुघल गार्डनही या भनवाचे सौंदर्य वाढवतात. याशिवाय, भारत सरकार त्यांच्या इतर खर्चांवर म्हणजे निवास, कर्मचारी, भोजन आणि पाहुण्यांच्या होस्टिंगवर दरवर्षी सुमारे २.२५ कोटी रुपये खर्च करते.

निवृत्तीनंतर कोणत्या सुविधा मिळतात?

निवृत्तीनंतर राष्ट्रपतींना अनेक प्रकारच्या सुविधा मिळतात. त्यांना दरमहा दीड लाख रुपये पेन्शन दिली जाते. तसेच, दिल्लीतील लुटियन्स झोनमध्ये त्यांना प्रत्येक सुविधांसह एक बंगला मिळतो. यासाठी कोणतंही भाडं आकारलं जात नाही. याशिवाय एक फोन दिला आहे. एवढेच नाही तर आयुष्यभर रेल्वे आणि विमानानं मोफत प्रवासही करता येतो. तसंच कामासाठी ५ खासगी कर्मचारीही असतात.

रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना कोणत्या सुविधा मिळतात?

रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना १.४० लाख डॉलर पगार मिळतो. याशिवाय पुतिन यांच्याकडं एक आलिशान सुपरयाटही आहे. रशियन नौदलासाठी आण्विक पाणबुडी बनवणाऱ्या सेवमाश या कंपनीनं ते तयार केलं आहे. पुतिन यांच्याकडं हवाई प्रवासासाठी निओ-क्लासिकल शैलीत तयार केलेल्या खास विमानही आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना कोणत्या सुविधा मिळतात?

सुरक्षेच्या बाबतीत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वात वरचं स्थान दिलं जातं. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना दरवर्षी पगार म्हणून ४,००,००० डॉलर मिळतात. त्यांच्यासोबत घर, वैयक्तिक विमान आणि हेलिकॉप्टरची सुविधाही मिळते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना पगाराव्यतिरिक्त १७ विविध प्रकारचे भत्तेही दिले जातात. त्यांना राहण्यासाठी अत्याधुनिक सुविधांसह एक घरही दिलं जातं. ज्याल व्हाईट हाऊस नावानं ओळखलं जातं. या व्हाईट हाऊसमध्ये १३२ खोल्या, ३५ स्नानगृहं आहेत. यासोबतच टेनिस कोर्ट, बॉलिंग अॅली, फॅमिली मूव्ही थिएटर, जॉगिंग ट्रॅक आणि स्विमिंग पूल देखील आहे. अमेरिकेच्या निवृत्त राष्ट्राध्यक्षांना दरमहा दीड कोटींच्या जवळपास पेन्शन मिळतं.

पाकिस्तानात राष्ट्रपतींना कोणत्या सुविधा मिळतात?

पाकिस्तानच्या राष्ट्रपतींना दरमहा ८० हजार रुपये वेतन मिळतं, जे भारतीय रुपयांनुसार ४९ हजार रुपये आहे. भारतीय राष्ट्रपतींच्या पगारानुसार हे प्रमाण खूपच कमी आहे. तसेच त्यांना राहण्यासाठी घर आणि सुरक्षितताही दिली जाते. मात्र, माजी राष्ट्रपतींसोबतही हाच प्रोटोकॉल भारत आणि इतर देशांमध्ये पाळला जात नाही.

चीनच्या राष्ट्राध्यक्षांना किती पगार मिळतो?

चीनमध्ये राष्ट्राध्यक्षांचा पगार पूर्वी खूपच कमी होता. २०१५ मध्ये त्यात ६२ टक्क्यांनी वाढ झाली होती. आता चीनमध्ये राष्ट्रपतींना २२ हजार डॉलर्स पगार मिळतो. याशिवाय राष्ट्रपतींना भारतात ज्या सुविधा दिल्या जातात त्या इथेही मिळतात.
जर्मन चांसलरची पगार म्हणून वर्षाला १.५९ कोटी रुपये मिळतात. त्याच वेळी, दोन डझनहून अधिक गुप्तचर एजंट त्यांच्या सुरक्षेसाठी नेहमीच असतात. कुलपतींना या एजंटांशी गुप्तचर संवादांचं प्रशिक्षणही दिलं जात असल्याचं बोललं जातं.

बांगलादेशात राष्ट्रपतींचं वेतन एक लाखापेक्षा कमी

शेजारी देश बांगलादेशाबद्दल बोलायचं झालं तर, येथील राष्ट्रपतींना दरमहा ९५ हजार रुपये पगार मिळतो. त्यांना राहण्यासाठी अधिकृत घरं दिली जातात. याशिवाय सुरक्षेसाठी कमांडो तैनात आहेत. मात्र, सुविधांच्या बाबतीत ते भारताच्या खूप मागं आहे.

Leave a comment