Viral Video : दारुडयाला चावल्यामुळं ‘किंग कोब्रा’चा मृत्यू..! पुढं काय झालं बघा

WhatsApp Group

Viral Video : किंग कोब्राला माणूस घाबरतो. कारण हा साप अत्यंत विषारी आहे. होय, त्याचा एक चावा माणसाला झोपवू शकतो. मात्र उत्तर प्रदेशातील कुशीनगरमधून एक विचित्र प्रकार समोर आला आहे, यामुळे सगळे लोक विचारात पडले आहेत. लोकांना आश्चर्य वाटते की हे कसे शक्य आहे. वास्तविक, त्या व्यक्तीवर किंग कोब्रा सापाने हल्ला केला आणि त्याच्या पायाला आणि हाताला चावा घेतला. पण पुढची कथा वेदनादायक नसून फार विचित्र आहे! कारण साप चावल्यामुळे ‘मद्यपी’ला काहीही झाले नाही, पण सापाची अवस्था बिघडली.

माध्यमांच्या वृत्तानुसार, कुशीनगर जिल्ह्यात एक मद्यधुंद व्यक्ती मृत साप घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचला. आपत्कालीन कक्षात पोहोचल्यावर त्या व्यक्तीने डॉक्टरांना सांगितले की, साप चावल्यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे. सापाने त्याला खांद्यावर व हाताला दोन ठिकाणी चावा घेतला होता. त्या व्यक्तीने डॉक्टरांना अँटी व्हेनमचे इंजेक्शन देण्यास सांगितले. सलाउद्दीन मन्सूरी असे या ३५ वर्षीय व्यक्तीचे नाव असून तो पडरौना येथील रहिवासी आहे.

हेही वाचा – …तर तुमचंही लिव्हर १०० वर्ष जगू शकतं! संशोधकांचा अभ्यासादरम्यान दावा

ही व्हायरल क्लिप kashyap_memer या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आली आहे, जी सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केली जात आहे. रुग्णाच्या बेडवर बसून एक व्यक्ती डॉक्टरांशी बोलत असल्याचे दिसून येते. व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला आहे की ‘किंग कोब्रा’ने त्या व्यक्तीला दोन ठिकाणी चावा घेतला, त्यानंतर सापाचा मृत्यू झाला. एवढेच नाही तर त्या व्यक्तीने मृत सापही सोबत एका पिशवीत हॉस्पिटलमध्ये आणला होता, ज्याने त्याला दंश केला होता.

Leave a comment