एलोन मस्क जगातील पहिले व्यक्ती, ज्यांची संपत्ती झालीय 400 बिलियन डॉलर्स!

WhatsApp Group

Elon Musk : एलोन मस्क हे जगातील पहिले व्यक्ती बनले आहेत, ज्यांची एकूण संपत्ती $400 अब्ज आहे. आजपर्यंत असा इतिहास कोणीही निर्माण केलेला नाही. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, SpaceX च्या इनसाइडर ट्रेडिंग विक्रीमुळे मस्क यांच्या नेट वर्थमध्ये अचानक 50 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. मात्र, शेअर बाजार बंद झाल्यानंतर आणि टेस्लाच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यानंतर मस्क यांच्या संपत्तीत आणखी वाढ झाली आहे.

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, एलोन मस्क यांच्या एकूण संपत्तीत बुधवारी $62 अब्जची वाढ झाली आणि एकूण संपत्ती $447 अब्ज झाली आहे. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर मस्क यांच्या संपत्तीत 183 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. दुसरीकडे, टेस्लाच्या शेअर्समध्येही चांगली वाढ झाली आहे. 4 डिसेंबरपासून, टेस्लाच्या शेअर्समध्ये 72 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

बुधवारी ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, SpaceX आणि त्याच्या गुंतवणूकदारांनी कंपनीचे कर्मचारी आणि इतर अंतर्गत व्यक्तींकडून $1.25 अब्ज किमतीचे शेअर्स खरेदी करण्याचे मान्य केले आहे. या करारानंतर SpaceX चे मूल्य 350 अब्ज डॉलर झाले आहे. जे जगातील सर्वात मोठे खासगी स्टार्टअप बनले आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, या डीलमुळे एलोन मस्क यांच्या नेट वर्थमध्ये 50 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. दुसरीकडे, टेस्ला शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे मस्क यांच्या संपत्तीतही वाढ झाली आणि त्यांना 12 अब्ज डॉलर्सचा नफा झाला. अशा परिस्थितीत मस्क यांनी एका दिवसात 62 अब्ज डॉलर्सचा नफा कमावला. त्यानंतर त्यांची एकूण संपत्ती 447 अब्ज डॉलर झाली आहे.

183 अब्ज डॉलर्सची वाढ

मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर इलॉन मस्क यांच्या संपत्तीत आणखी वाढ झाली आहे. 5 नोव्हेंबर रोजी इलॉन मस्कची एकूण संपत्ती $264 अब्ज होती. आता त्यांची एकूण संपत्ती ४४७ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. याचा अर्थ इलॉन मस्कच्या संपत्तीत अल्पावधीतच 183 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. तर चालू वर्षात 200 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, 1 जुलै 2023 रोजी एलोन मस्क यांची एकूण संपत्ती $126 अब्ज होती. ज्यामध्ये सुमारे दीड वर्षात 3.55 पट म्हणजेच 255 टक्के वाढ दिसून आली आहे.

टेस्ला शेअर्स रेकॉर्ड पातळीवर

दुसरीकडे, टेस्ला शेअर्समध्ये चांगली वाढ झाली आहे. बुधवारी ट्रेडिंग सत्रादरम्यान, टेस्लाचे शेअर्स सुमारे 6 टक्क्यांनी वाढले आणि $424.88 च्या आयुष्यातील उच्च पातळीवर पोहोचले. तसे, 4 नोव्हेंबरपासून टेस्ला शेअर्समध्ये चांगली वाढ होत आहे. 4 नोव्हेंबर रोजी कंपनीच्या समभागांची किंमत $242.84 होती. ज्यामध्ये आतापर्यंत 75 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. यूएस स्टॉक मार्केट बंद झाल्यानंतर, टेस्लाचे शेअर्स 5.93 टक्क्यांच्या वाढीसह $424.77 वर बंद झाले.

मस्क यांनी वर्ष संपण्यापूर्वी 500 अब्ज डॉलर्सवर लक्ष ठेवले आहे. तिथे पोहोचण्यासाठी त्यांच्याकडे 15 दिवसांपेक्षा जास्त वेळ आहे आणि त्यांना फक्त 53 अब्ज डॉलर्सची गरज आहे. याचा अर्थ 500 अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठण्यासाठी मस्क यांच्या संपत्तीत दररोज सरासरी 2.76 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ करावी लागेल. तसे, 5 नोव्हेंबरपासून इलॉन त्यांच्या संपत्तीत दररोज सरासरी 5 अब्ज डॉलर्सची वाढ होत आहे. अशा स्थितीत वर्षअखेरीस मस्क यांची संपत्ती सहज 500 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment