EPFO : तुमच्या PF अकाऊंटमध्ये व्याजाचे पैसे आले का? घरबसल्या ‘असं’ चेक करा!

WhatsApp Group

EPFO : देशातील 6 कोटींहून अधिक जनतेसाठी एक आनंदाची बातमी आहे. खरं तर, सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांच्या खात्यात पीएफ व्याजाचे पैसे पाठवण्यास सुरुवात केली आहे आणि 98 टक्के भागधारक कंपन्यांचे व्याज 6 मार्च 2023 पर्यंत अपडेट केले गेले आहे. सरकारच्या वतीने कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी संसदेत ही माहिती दिली.

EPF योजनेत कर्मचारी आणि त्याची कंपनी दर महिन्याला समान प्रमाणात योगदान देतात. जे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या 12 टक्के आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने आपल्या पीएफ खात्यातील शिल्लक तपासत रहावे. हे काम तुम्ही काही मिनिटांत घरी बसून करू शकता. EPFO ने शिल्लक तपासण्यासाठी अनेक सुविधा दिल्या आहेत. चला तर जाणून घ्या ते कसे तपासू शकता…

SMS द्वारे तपासा

शिल्लक तपासण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाइलवरून SMS द्वारे पीएफ खात्यातील शिल्लक तपासू शकता. यासाठी तुम्हाला फक्त EPFO ने जारी केलेल्या नंबरवर मेसेज करावा लागेल. तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरवरून 7738299899 वर SMS करताच, ते तुम्हाला थोड्याच वेळात सर्व माहिती देईल.

हेही वाचा – हे माहितीये…रागाच्या भरात लोक दरवाजा का आपटतात? जाणून घ्या कारण!

यासाठी तुम्हाला ‘EPFOHO UAN’ लिहून 7738299899 वर पाठवावे लागेल. हे 10 भाषांमध्ये उपलब्ध आहे. या माहितीसाठी, तुम्हाला UAN ची पॅन-आधार लिंक आवश्यक आहे. जर तुम्हाला संदेश पाठवायचा नसेल तर तुम्ही मिस्ड कॉलद्वारेही माहिती मिळवू शकता. यासाठी EPFO ​​ने 9966044425 वर एक नंबर जारी केला आहे. त्यावर तुम्हाला फक्त मिस कॉल दाबावा लागेल. मिस कॉल मारताच तुम्हाला काही सेकंदात माहिती मिळेल.

EPFO पोर्टलवरून तपासा

  • EPFAO च्या अधिकृत वेबसाइटवर जा (www.epfindia.gov.in)
  • यानंतर ई-पासबुकवर क्लिक करा.
  • नवीन पेजवर UAN पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाका
  • येथे सदस्य आयडीचा पर्याय निवडा
  • आता तुम्हाला पासबुकची माहिती पीडीएफ फॉरमॅटमध्ये मिळेल.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment