Ethiopia Volcano Eruption : इथिओपियातील Hayli Gubbi या ज्वालामुखीचा तब्बल 12 हजार वर्षांनंतर पहिल्यांदाच भयानक उद्रेक झाला असून त्यातून निर्माण झालेला प्रचंड राखेचा ढग 25,000 ते 45,000 फूटांच्या उंचीवरून हजारो किलोमीटर प्रवास करत भारतात पोहोचला आहे. या विषारी ढगाचा परिणाम दिल्ली, राजस्थान, हरयाणा, पंजाब आणि उत्तर भारतातील अनेक राज्यांवर गंभीर स्वरूपात जाणवत आहे.
या राखेमध्ये ज्वालामुखीची राख, सल्फर डायऑक्साइड, सूक्ष्म काच व खडकांचे कण असल्याने भारताच्या हवेत प्रदूषणाची पातळी झपाट्याने वाढली आहे आणि विमान वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे.
🇪🇹 For the first time in recorded history, Ethiopia’s Hayli-Gubbi volcano has erupted
— Visegrád 24 (@visegrad24) November 24, 2025
A plume of ash rose 10–15 km into the sky and is moving toward the southwestern Arabian Peninsula, according to VolcanoDiscovery.
The awakening of Hayli-Gubbi is the first in observational… pic.twitter.com/GWrd8ljcec
विमान वाहतूक कोलमडली
इथिओपियातील ज्वालामुखीच्या राखेमुळे आकाश काळवंडले असून Air India, Akasa Air, IndiGo आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या अनेक उड्डाणांना वळवणे किंवा रद्द करणे भाग पडले.
दिल्लीतील अनेक भागांत—आनंद विहार, AIIMS, सफदरजंग—हवेत प्रदूषणाची तीव्रता वाढली असून AQI 400 पेक्षा जास्त नोंदवला गेला आहे. दृश्यता मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे.
IMD ची माहिती
भारत हवामान विभाग (IMD) च्या अंदाजानुसार हा राखेचा ढग आज (मंगळवार) संध्याकाळी 7.30 पर्यंत भारतातून पूर्णपणे बाहेर पडेल आणि चीनच्या दिशेने सरकेल.
IMD प्रमुख मृद्युंजय महापात्र यांनी सांगितले, “उच्चस्तरीय वाऱ्यांमुळे राखेचा ढग रेड सी, यमन, ओमान मार्गे अरब समुद्र पार करून उत्तर व पश्चिम भारतात पोहोचला.”
IMD ने मुंबई, दिल्लीत आणि कोलकाता Met Office मधून अंतरराष्ट्रीय ICAO-standard SIGMET इशारे जारी केले आहेत, ज्यामध्ये प्रदूषित हवाई क्षेत्र आणि फ्लाइट लेव्हल्स टाळण्याच्या दिशा दिल्या आहेत.
⚠️ Ethiopia: The Hayli Gobi volcano erupted today for the first time in ten thousand years and sent ash up to a height of 15 km.🔥🔥 pic.twitter.com/aiPVhhO4rr
— Dr. Fundji Benedict (@Fundji3) November 24, 2025
राखेमुळे आरोग्याला गंभीर धोका
- श्वसनाचा त्रास, दम्याचे रुग्ण धोक्यात
- डोळ्यांत जळजळ, त्वचेची चिडचिड
- मास्क व गॉगल्स वापरण्याचा सल्ला
- घराबाहेर अनावश्यक फिरणे टाळण्याचे आवाहन
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!