

मुंबई : अनेकांची फेसबुक या जगप्रसिद्ध कंपनीत काम करण्याची इच्छा असते. काहीजण खूप वेळा अप्लाय करतात आणि वाट बघतात. पण आता एक वाईट बातमी समोर आली आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी मेटा यांच्या तिमाही कमाईत घट झाल्याचा परिणाम आता कर्मचाऱ्यांच्या भरतीवर होणार आहे. मेटा सीईओ मार्क झुकरबर्गनं म्हटलं आहे की, आम्ही मंदीत प्रवेश केला असून त्याचा परिणाम डिजिटल जाहिरात व्यवसायावर होणार आहे. त्यामुळे मेटा आता खर्च कमी करण्यावर भर देणार असून पुढील वर्षी कंपनी कर्मचाऱ्यांच्या भरतीचा वेग मंदावणार आहे.
२७ जुलै रोजी, मेटानं त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत महसूल एक टक्क्यानं घसरून २८.८ बिलियन डॉलर्स झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत महसूल २९.१ बिलियन डॉलर्स होता. मे महिन्यात कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचे संकेतही मेटानं दिले होते. त्याच वेळी, जुलैच्या सुरुवातीला मार्क झुकरबर्गनं मेटा कर्मचार्यांना सांगितलं की, कंपनी यावर्षी ३० टक्के कमी अभियंत्यांची भरती करेल.
Meta: Instagram owner has first ever fall in sales revenue but monthly Facebook usage grows https://t.co/cCDsspKRSF pic.twitter.com/eaCb3su2Au
— City A.M. (@CityAM) July 28, 2022
मंदीचा खोलवर परिणाम होईल
मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, मेटाच्या कमाई कॉन्फरन्स कॉलला संबोधित करताना, मार्क झुकरबर्ग म्हणाला, ”इतिहासात पहिल्यांदाच मेटाच्या कमाईत घट झाली आहे. डिजिटल जाहिरातींची जागा कमी झाल्यामुळं हे घडलं आहे. कंपनी पुढील वर्षापर्यंत कर्मचाऱ्यांची संख्या सातत्यानं कमी करणार आहे. मेटावरील अनेक संघ लहान असतील जेणेकरून त्यांची ऊर्जा इतरत्र वापरली जाऊ शकेल. त्यांना कंपनीच्या नेत्यांना दुप्पट, संकुचित आणि संघ पुनर्रचना करण्याचे स्वातंत्र्य द्यायचं आहे.”
हेही वाचा – फेसबुकच्या मार्क झुकरबर्गनं तिप्पट किमतीला विकलं घर; आकडा ऐकाल तर..!
झुकेरबर्ग म्हणाला, ”कंपनीचे कार्यबल पुढील काही तिमाहींमध्ये स्थिर राहील, कारण या वर्षी आम्ही अनेक कर्मचाऱ्यांना कामावर घेतलं आहे. मात्र भरती प्रक्रिया आणखी मंदावली जाणार आहे. मंदीचा हा काळ किती काळ आणि किती खोल असेल, हे सांगता येत नाही. पण, शेवटच्या तिमाहीपेक्षा पुढे त्याचा अधिक परिणाम होईल, असं निश्चितपणं म्हणता येईल.”
मेटानं कळवलं की त्यांनी दुसऱ्या तिमाहीत ५,७०० नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली. यातील बहुतांश कर्मचाऱ्यांना तांत्रिक संघात ठेवण्यात आलं आहे. दुसऱ्या तिमाहीच्या शेवटी, मेटामध्ये एकूण ८३,५०० कर्मचारी होते, जे मागील वर्षीच्या याच तिमाहीतील कर्मचाऱ्यांच्या संख्येपेक्षा ३२ टक्के अधिक आहेत.