धर्माच्या आड पापाचा घोटाळा! ‘या’ मंदिरात बनावट सेवकांचा धुमाकूळ, पोलिसांनी १२ जणांना पकडलं

WhatsApp Group

Puri Fake Sevaks Arrested : पुरी शहरातील प्रसिद्ध श्री जगन्नाथ मंदिरात भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत काही बनावट सेवकांनी मोठा फसवणूक रचला. सोमवारी पुरी पोलिसांनी १२ जणांना अटक केली, जे सेवकांचे कपडे परिधान करून मंदिर परिसरात भाविकांकडून बेकायदेशीर पैसे वसूल करत होते.

अटक केलेल्या आरोपींचे वय २० ते ५१ वर्षे दरम्यान असून, हे सर्व बडाडंडा (ग्रँड रोड) व परिक्रमा मार्ग परिसरातून पकडले गेले. हे बनावट सेवक भाविकांची अंधश्रद्धा आणि श्रद्धेची भावना वापरून पैसे काढत होते.

कोणत्या राज्यांतील भाविक होते लक्ष्य?

पोलिसांच्या तपासानुसार, हे आरोपी अनेक महिन्यांपासून सक्रिय होते. त्यांनी मुख्यतः पश्चिम बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश येथील भाविकांना लक्ष्य केले. मंदिरात सेवा देत असल्याचे भासवून हे लोक भाविकांकडून विविध कारणांनी रोख रक्कम घेत होते. पुरी पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (माजी ट्विटर) वर पोस्ट करत सांगितले की, “बडाडंडा आणि परिक्रमा मार्ग परिसरात बनावट सेवक म्हणून भाविकांची फसवणूक करणाऱ्या १२ जणांना अटक करण्यात आली आहे.”

हेही वाचा – “आम्ही बुडालो तर अर्धी दुनिया घेऊन जाऊ”, पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची भारताला अणुयुद्धाची धमकी!

मोबाईल आणि रोकड जप्त

छाप्यामध्ये पोलिसांनी १४ मोबाईल फोन आणि सुमारे ₹२०,००० रोकड जप्त केली. काही दिवसांपूर्वी भाविकांनी मंदिरातील काही ‘सेवकां’कडून होत असलेल्या त्रासाबद्दल पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या बनावट सेवकांना रंगेहात पकडले.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment