बाटलीत पेट्रोल देत नाही, ऐकल्यावर माणसानं केला ‘असा’ जुगाड..! पंपावर जमली गर्दी; VIDEO व्हायरल!

WhatsApp Group

Kanpur Petrol Pump Video : आपण भारतीय लोक आपल्या पातळीवर प्रत्येक गोष्टीचा जुगाड करतो. मुद्दा तांत्रिक असो की आणखी काही…आपण काहीही करू शकतो. असंच एक प्रकरण कानपूरमधून समोर आलं आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी एक माणूस बाटलीतून पेट्रोल घेण्यासाठी पेट्रोल पंपावर पोहोचला. त्यांना बाटलीत पेट्रोल देण्यास पंप कर्मचाऱ्यांनी नकार दिला. तो माणूस बराच वेळ पंप कर्मचाऱ्यांसमोर कैफियत मांडत राहिला, मात्र त्याची कैफियत कोणीही ऐकून घेतली नाही. त्यामुळं दुखावलेल्या त्या माणसानं मेकॅनिकला गाठलं आणि बुलेटची टाकीच पेट्रोल पंपावर आणली. हा प्रकार पाहून पंपावर प्रेक्षकांची गर्दी झाली. हा बुलेट बाईकची टाकी पेट्रोल पंपावर आणणारा माणूस नगरसेवक होता.

काय आहे संपूर्ण घटना

कोपरगंज येथे राहणारे माजी नगरसेवक सुशील तिवारी यांच्या बुलेट बाईकचं पेट्रोल संपलं. त्यांनी बुलेट तिथंच उभी केली आणि आजूबाजूला बाटलीची व्यवस्था केली. बाटली घेऊन पेट्रोल घेण्यासाठी ते पंपावर पोहोचले. पंप कर्मचाऱ्यांकडे पेट्रोलची मागणी केली असता त्यांनी ते देण्यास नकार दिला. यावर तिवारी पंप कर्मचाऱ्यांवर संतापले. मात्र पंपाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना समजावून सांगितलं, की बाटलीत पेट्रोल दिले तर माझी नोकरी जाईल. यानंतर माजी नगरसेवकाचा राग शांत झाला.

हेही वाचा – मित्राला भेटायला गेला आणि फसला..! ‘तो’ प्रकार पाहून रोहित शर्मानं कपाळावर मारला हात; पाहा VIDEO

मग तिवारी यांनी मेकॅनिककडं जाऊन बुलेटची टाकी उघडली. पेट्रोल भरण्यासाठी तिवारी बुलेटची टाकीच घेऊन पंपावर पोहोचले, तेव्हा रस्त्यानं जाणाऱ्यांची गर्दी जमली. तिवारींनी टाकीत ५०० रुपयांचं पेट्रोल भरलं. पेट्रोलनं भरलेली टाकी घेऊन ते मेकॅनिककडे पोहोचले, टाकी बसवल्यानंतर ते घराकडं निघाले. पेट्रोल संपले याचा अंदाजच येत नव्हता. त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागला.

कानपूरमध्ये बाटल्यांमध्ये पेट्रोल देण्यावर बंदी

कानपूरमधील भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर ३ जुलै रोजी न्यू रोड येथे हिंसाचार उसळला होता. एका विशिष्ट समुदायानं पेट्रोल बॉम्ब आणि दगडांनी हल्ला केला होता. एसआयटीच्या तपासात आंदोलकांनी डेप्युटी पॅड येथील पेट्रोल पंपावरून बाटल्यांमध्ये पेट्रोल घेतल्याचं समोर आलं, ज्याचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. जिल्हा प्रशासनानं तो पेट्रोलपंप जप्त केला होता. या घटनेमुळं कानपूरमध्ये बाटल्यांमध्ये पेट्रोल देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या गोष्टीमुळं सर्वसामान्यांचेही हाल होत आहेत. एखाद्याच्या गाडीचं पेट्रोल संपलं तर त्याला गाडी ढकलून पेट्रोल पंपावर न्यावी लागते.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment