

Nawaz Sharif : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या ड्रायव्हरने एका महिलेसोबत असभ्य वर्तन केले असून, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लंडनमध्ये एका महिलेने वाटेत नवाझ यांची कार थांबवली आणि त्यांना एक अस्वस्थ प्रश्न विचारला, ज्यामुळे नवाझ यांच्या ड्रायव्हरने महिलेच्या तोंडावर थुंकले.
लंडनमध्ये घडला प्रकार
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लंडनमधील महिलेने नवाझ यांच्या कारला थांबवले, ज्यामध्ये नवाझ ड्रायव्हरच्या शेजारी बसले होते. यावेळी एक महिला आपल्या मोबाईलवर घटना रेकॉर्ड करत तेथे पोहोचली आणि नवाझ शरीफ यांना विचारले की ते भ्रष्ट आहेत का? यानंतर ड्रायव्हर महिलेच्या चेहऱ्यावर थुंकला. त्याने खिडकीची काच वर केली आणि गाडी पुढे निघून गेले. डॉक्टर फातिमा नावाच्या युजरने ट्विटर या सोशल मीडिया हँडलवर या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
हेही वाचा – World Cup 2023 : “त्याला भारताच्या संघात प्रवेश मिळू नये…”, स्पष्टच बोलला गौतम गंभीर!
लंडनमध्ये राहतात नवाझ
नवाझ शरीफ यांना 2018 मध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर 2019 मध्ये नवाझ उपचारासाठी लंडनला गेले आणि तेव्हापासून ते तिथेच राहत होते. पुन्हा निवडणूक लढवता यावी यासाठी नवाझ पाकिस्तानात परतण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे. नवाझ यांनी आपली मुलगी मरियमला लंडनला बोलावल्याचीही बातमी आहे. अशा परिस्थितीत मरियम पुढील आठवड्यात लंडनला जाऊन काही दिवस वडिलांसोबत राहू शकते.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!