

Nobel Prize 2022 : यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार फ्रेंच लेखिका अॅनी एरनॉक्स यांना प्रदान करण्यात येणार आहे. अॅनी एरनॉक्स यांच्या नावाची घोषणा नोबेल पारितोषिक समितीने केली आहे. अॅनी एरनॉक्स यांनी फ्रेंचसह इंग्रजीमध्ये अनेक कादंबऱ्या, नाटके आणि लेख लिहिले आहेत. अनेक चित्रपटांच्या कथाही त्यांनी लिहिल्या आहेत. अॅनी यांचा जन्म १९४० साली झाला. अॅनी एरनॉक्स यांच्या प्रसिद्ध कामांमध्ये जर्नल डु डेहोर्स (Journal du dehors), ला व्हिए एक्सटेरिअर (La vie extérieure) या पुस्तकांचा समावेश आहे. या पुस्तकांमध्ये अॅनी यांनी त्यांच्या लहानपणापासूनचे लेख समाविष्ट केले आहेत.
अॅनी एरनॉक्स यांनी १९७४ मध्ये लेस आर्मोइर्स विदेस (Cleaned Out) या आत्मचरित्रात्मक कादंबरीद्वारे तिच्या लेखनाला सुरुवात केली. १९८४ मध्ये, त्यांनी ला प्लेस (ए मॅन्स प्लेस) या त्यांच्या आणखी एका कामासाठी रेनॉडॉट पुरस्कार जिंकला. एका पुस्तकात त्यांचे त्यांच्या वडिलांसोबतचे नाते आणि फ्रान्समधील एका छोट्या गावात वाढलेल्या त्यांच्या अनुभवांवर आणि पुढे जाण्याच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केले आहे.
This year’s #NobelPrize laureate in literature Annie Ernaux has said that writing is a political act, opening our eyes for social inequality. For this purpose she uses language as “a knife”, as she calls it, to tear apart the veils of imagination. pic.twitter.com/TQm6rxjvMp
— The Nobel Prize (@NobelPrize) October 6, 2022
किती बक्षीस रक्कम मिळणार?
नोबेल पारितोषिक स्वीडिश शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या नावावर आहे. या पुरस्काराच्या विजेत्याला सुवर्णपदक आणि एक कोटी स्वीडिश मुकुट (सुमारे ८.२० कोटी रुपये) प्रदान केले जातात. साहित्यातील नोबेल पुरस्कार १९०१ पासून दिला जातो. २०२१ सालचे साहित्याचे नोबेल पारितोषिक ब्रिटिश कादंबरीकार अब्दुलराजक गुरनाह यांना मिळाले होते. गुरनाह यांची पॅराडाइज ही कादंबरी खूप प्रसिद्ध झाली आहे. ही कादंबरी बुकर आणि व्हिटब्रेड या दोन्ही पुरस्कारांसाठी निवडण्यात आली होती.
French author Annie Ernaux wins 2022 Nobel Prize for Literature https://t.co/NfhusGOtcZ pic.twitter.com/LGNsUay2Wt
— Reuters (@Reuters) October 6, 2022
हेही वाचा – थायलंडमध्ये पाळणाघरात रक्तपात..! माजी पोलिसानं ३४ जणांना संपवलं, २३ मुलांचा समावेश!
सलमान रश्दींचे नाव चर्चेत
या पुरस्काराची घोषणा होईपर्यंत भारतीय वंशाचे लेखक सलमान रश्दी यांना यंदाचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळण्याची शक्यता जोरात होती. या वर्षी ऑगस्टमध्ये न्यूयॉर्कमध्ये सलमान रश्दी यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला होता. एका कार्यक्रमात ते व्याख्यान देण्यासाठी जात असताना ही घटना घडली. सलमान रश्दी १९८८ च्या द सॅटॅनिक व्हर्सेस या कादंबरीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आले होते. या कादंबरीत रश्दी यांनी इस्लामविरोधी वक्तव्य केल्याचा आरोप आहे. भारतासह अनेक देशांमध्ये या कादंबरीवर बंदी आहे.
Annie Ernaux reçoit le Nobel de littérature pour son oeuvre.
Bouleversée par cette grande auteure féministe, populaire et sensible, soutien de notre campagne.
Merci à elle.https://t.co/NTYHV9BWLc pic.twitter.com/LasKPSMgYB
— Clémence Guetté (@Clemence_Guette) October 6, 2022
रसायनशास्त्रातील नोबेल…
या वर्षीचा रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार कॅरोलिन आर. बर्टोझी, मॉर्टन मेल्डल आणि के. बॅरी शार्पलेस यांना प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. पदार्थ तयार करण्यासाठी ‘रेणूंचे एकाचवेळी विखंडन’ या विषयांबद्दल या तीन शास्त्रज्ञांना रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले आहे.