

मुंबई : ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या वेब सीरीजनं जगभरात धुमाकूळ घातला. या सीरीजमुळं प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री एमिलिया क्लार्क सध्या एका गोष्टीमुळं चर्चेत आलीय. एमिलिया ही मेंदूतील रक्तक्षय (Brain Aneurysm) या गंभीर आजाराशी झुंज देत आहे. या आजारामुळं तिचे अनेक अवयवही निकामी झाले आहेत. याचा खुलासा तिनं स्वतः एका मुलाखतीदरम्यान केला आहे. एमिलिया क्लार्कनं ‘गेम ऑफ थ्रोन्स’मध्ये ‘मदर ऑफ ड्रॅगन’ची भूमिका साकारली होती. तिनं सांगितलं की त्याने सांगितले गेम ऑफ थ्रोन्स’च्या शूटिंगदरम्यान तिच्या मेंदूची शस्त्रक्रियाही झाली होती.
मेंदूचा एक भाग काम करत नाही!
मुलाखतीदरम्यान एमिलियानं सांगितलं, की जेव्हा ती या हिट टीव्ही शोमध्ये काम करत होती, तेव्हा तिला दोनदा या धोकादायक आजाराचा सामना करावा लागला होता. या वेदना सर्वात त्रासदायक होत्या. या दोन्ही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीतून बाहेर यायला तिला बराच वेळ लागला. तिच्या मेंदूचा एक भाग आता काम करत नाही. शस्त्रक्रियेनंतर तिच्या मेंदूचा एक भाग गायब झाल्यासारखं तिला वाटतं. तरीही ती बोलू शकते आणि तिचं आयुष्य सामान्यपणे जगत आहे. ”मी माझं जीवन कल्पकतेनं जगत आहे. या आजारानंतर अनेकांचे प्राण वाचले आहेत. हा आजार असूनही मला माझे डायलॉग्स आठवतात आणि मी माझा शो चांगला करत आहे”, असं एमिलियानं सांगितलं.
या आजाराची लक्षणं काय?
या आजारात लोकांच्या मेंदूच्या नसा कमकुवत होऊन फुगल्याचे दिसून आलं आहे. हा आजार मेंदूच्या कोणत्याही भागात होऊ शकतो. या आजारामुळं रक्तस्त्राव होण्याचा धोकाही खूप जास्त असतो. अतिशय तीव्र डोकेदुखी, हात-पाय अर्धांगवायू, सतत अशक्तपणा आणि चक्कर येणं ही या आजाराची लक्षणं आहेत. याशिवाय अपस्मार म्हणजे आकडी येणं सुद्धा होऊ शकतं.
ब्रेन एन्युरिझम म्हणजे काय?
ब्रेन एन्युरिझमनं पीडित व्यक्तीच्या मेंदूच्या नसा कमकुवत होऊन फुगतात. ५० वर्षांवरील लोक किंवा उच्च रक्तदाब, अनुवांशिक रोग, संसर्ग किंवा मेंदूला दुखापत आणि तणावग्रस्त व्यक्तींना या आजाराचा सामना करावा लागतो. हा आजार मेंदूच्या कोणत्याही भागात होऊ शकतो. शिवाय नसा कधीही फुटण्याचा धोका असतो. या आजारानंतर एमिलियानं मेंदूशी संबंधित आणि स्ट्रोक पीडितांसाठी SameYou नावाची एक संस्था सुरू केलीय. स्वत:ची वैद्यकीय परिस्थिती स्वीकारून ती या संस्थेमार्फत इतरांना मदत करते आहे.