गणपती बाप्पाचंही बनलं आधारकार्ड..! पत्ता, जन्मतारीख बघा काय लिहिलीय

WhatsApp Group

Ganesh Chaturthi 2022 : लोक वर्षभर गणपतीच्या आगमनाची वाट पाहत असतात. चतुर्थी जवळ येताच लोक मोठ्या थाटामाटात आणि आनंदानं, नाचत आणि गाणी गाऊन गणपतीला घरी आणतात. पण झारखंडमधील जमशेदपूरच्या साक्चीमधून समोर आलेली बातमी काही वेगळीच आहे. वास्तविक, इथं आधारकार्डच्या रुपात गणपतीचं मंडळ तयार करण्यात आलं असून, ते आता लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

भगवान गणेशाच्या आधारकार्डमध्ये त्यांच्या चित्रासोबत आधार कार्ड क्रमांकही लिहिला आहे. पत्त्याच्या जागी ‘महादेव पुत्र श्री गणेश, कैलास पर्वत, वरचा मजला, मानसरोवर तलावाजवळ वरचा मजला, कैलास पिनकोड – 000001’ असं लिहिलं आहे.

आधार कार्डमध्ये एक कटआउट आहे ज्यामध्ये गणपतीची मूर्ती ठेवली आहे. त्याच्या बाजूला बारकोड स्कॅन केल्यावर, स्क्रीनवर गणपतीच्या फोटोंसह एक Google लिंक उघडते. थोडीशी गंमत वाटत असल्यानं लोकही सेल्फी घेत या मंडळाची प्रसिद्धी दूरवर पोहोचवत आहेत. त्याचवेळी या मंडळाचे संयोजक सौरभ कुमार यांनी सांगितलं, की ते कोलकात्याला गेले होते. तिथं असे विविध प्रकार सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत करण्यात आले होते. त्यामुळं त्यांनीही गणपतीचं आधारकार्ड मिळवले. याद्वारे तो जनतेला हा संदेश देऊ इच्छितो, की ज्यांचे अद्याप आधार कार्ड बनलेले नाही त्यांनी ते लवकरात लवकर बनवावं, कारण आधार कार्ड खूप महत्वाचं आहे.

हेही वाचा – ‘कपल’ लोकांसाठी गणपती मंदिर..! ‘हा’ बाप्पा करतो सगळ्या इच्छा पूर्ण; नक्की वाचा!

गणेश चतुर्थीचा सण भारतात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि हजारो भक्त मंदिरे आणि ‘गणेशोत्सव मंडळात’ प्रार्थना करण्यासाठी येतात. कालपासून सुरू झालेला हा दहा दिवसांचा शुभ उत्सव चतुर्थी तिथीला सुरू होऊन अनंत चतुर्दशीला संपतो. सौभाग्याची आणि बुद्धीची सौभाग्याची देवता असलेल्या गणेशाचे भक्त भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात त्यांचा जन्म साजरा करतात.

याशिवाय झारखंडमधील बोकारो येथील सेक्टर ४ मजदूर मैदानात बंगालच्या कारागिरांनी ८० फूट उंच मंडळ बनवलं आहे. ज्यामध्ये कोलकाता येथून आणलेली १६ फूट उंचीची गणपतीची मूर्ती आहे. पहिल्यांदाच मजदूर मैदानावर गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. आयोजन समितीचे अजय राय आणि आनंद कुमार यांनी याबाबत माहिती दिली. ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण दहा दिवस गणेश महोत्सव साजरा केला जाणार असून यादरम्यान भव्य जत्रेचेही आयोजन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम बोकारोची शान होईल, असं आयोजकांचं म्हणणं आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment