चॉकलेटच्या गणपतीचं गरम दुधात विसर्जन केलं आणि खाल्लं..! व्हायरल VIDEO पाहून नेटकरी संतापले

WhatsApp Group

Eco Friendly Chocolate Ganesha Murty : जेव्हापासून लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता येऊ लागली आहे, तेव्हापासून लोक पर्यावरणपूरक गोष्टींकडे वळू लागले आहेत. पर्यावरणाबाबत लोकांना जागरुक करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. छोट्या-छोट्या बदलांच्या माध्यमातून लोक पर्यावरणाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतात जेव्हा जेव्हा सण येतो तेव्हा पर्यावरणाची कमी हानी करण्याच्या प्रयत्नांचे पर्व सुरू होते. दुर्गापूजा असो की दिवाळी, प्रत्येक सणात पर्यावरणाची कमी हानी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत याची जाणीव लोकांना करून दिली जाते.

याअंतर्गत दिवाळीत फटाके फोडण्यावर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच, भारतातील अनेक उत्सवांमध्ये मूर्तीची स्थापना केली जाते. आता हेही थांबवावे अशी विनंती केली जात आहे. याचे कारण म्हणजे विसर्जनानंतर पाण्यात होणारी अस्वच्छता. पाण्यात लगेच विरघळणाऱ्या अशा साहित्यापासून मूर्ती बनवण्यास सांगितलं जात आहे. पर्यावरणपूरक शिल्पे बनवण्यावर भर दिला जातो. पण या गणेश चतुर्थीला असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे लोक संतप्त झाले आहेत.

चॉकलेटची गणेशमूर्ती

या व्हायरल व्हिडिओमध्ये एका फूड ब्लॉगरनं चॉकलेटचा गणेश दाखवला आहे. एक मुलगी खुर्चीवर बसली आहे आणि तिच्या समोरच एका प्लेटवर गणेशाची चॉकलेटची मूर्ती आहे. त्या मुलीनं आधी मूर्तीला दुधानं आंघोळ घातली आणि नंतर चमच्याने मूर्ती खाल्ली. मूर्तीसोबत बनवलेला हा व्हिडिओ पाहून लोक संतापले. लोकांनी हा व्हिडिओ देवतांचा अपमान म्हणून घेतला.

हेही वाचा – गणपती बाप्पाचंही बनलं आधारकार्ड..! पत्ता, जन्मतारीख बघा काय लिहिलीय

नकारात्मक प्रतिक्रिया

हा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. तो आतापर्यंत लाखो वेळा शेअर केले गेला आहे. फूड ब्लॉगर्सकडून देवदेवतांचा असा अपमान खपवून घेतला जाणार नाही, अशी प्रतिक्रिया लोकांनी दिली आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी फूड ब्लॉगरवर बहिष्कार टाकण्याची चर्चा केली. इको फ्रेंडलीच्या नावाखाली अनेकांनी याला उद्धटपणा म्हटलं आहे.

हेही वाचा – ‘कपल’ लोकांसाठी गणपती मंदिर..! ‘हा’ बाप्पा करतो सगळ्या इच्छा पूर्ण; नक्की वाचा!

देशभरात गणेश चतुर्थीचा उत्साह पाहायला मिळत आहे. या विशेष निमित्त विविध ठिकाणी गणेशमूर्तींची स्थापना करण्यात येत आहे. सध्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्याचा ट्रेंड वाढला आहे. गुजरात आपल्या खास शैलीसाठी ओळखला जातो. गुजरातमधील अहमदाबाद येथे राहणाऱ्या शिल्पा भट्ट गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कलाकृतींद्वारे चॉकलेट इको-फ्रेंडली गणेशमूर्ती बनवत आहेत. यावेळीही शिल्पानं आपल्या ग्राहकांना पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी चॉकलेट गणेशाच्या मूर्ती बनवल्या आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment