

Ghaziabad : उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुत्रा चावल्याने एका 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. रेबीजमुळे तीन दिवसांपूर्वी या मुलाची प्रकृती बिघडली होती. सोशल मीडियावर याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वडील आणि मुलगा रुग्णवाहिकेत रडताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये दिसणारा मुलगा रेबीजचा रुग्ण आहे, तो अस्वस्थ आहे, त्यामुळे तो रडत आहे. सोशल मीडियावर लोकांनी याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे.
गाझियाबादच्या विजयनगरच्या चरणसिंग कॉलनीत राहणाऱ्या याकुब यांचा मोठा मुलगा शाहवेज याला कुत्र्याने चावा घेतल्याचे सांगण्यात येत आहे. भीतीपोटी त्याने घरच्यांना काही सांगितले नाही. सुमारे दीड महिन्यानंतर शाहवेजला पाण्याची भीती वाटू लागली, त्याची प्रकृती बिघडू लागली. यानंतर मुलाला रुग्णालयात नेले असता त्याला दिल्लीला नेण्याचा सल्ला देण्यात आला. दिल्लीतील कोणत्याही रुग्णालयात मुलावर उपचार होऊ शकले नाहीत, असे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा – Health Insurance : तुमचा आरोग्य विमा ‘या’ 5 कारणांमुळे रिजेक्ट होऊ शकतो!
याकुब यांच्या शेजारी राहणारी एक महिला अनेक कुत्र्यांना खायला घालते, त्यामुळे तिथे कुत्रे असतात असा आरोप आहे. कुत्र्यांनी अनेक वेळा लोकांना चावले, पण तिचा विश्वास बसत नाही. आता गाझियाबाद महानगरपालिकेने महिलेला नोटीस बजावून विचारणा केली आहे, की कुत्र्यांची नोंदणी करून लसीकरण केले आहे का? उत्तर न मिळाल्यास कारवाई केली जाईल.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!