बद्रीनाथमध्ये ग्लेशियर कोसळलं..! ५७ कामगार बर्फाखाली अडकले

WhatsApp Group

Glacier outburst in Badrinath : हवामान पुन्हा एकदा बदलले आहे. हिमालयीन प्रदेशात बर्फवृष्टी होत आहे. सखल भागात पाऊस सुरू झाला आहे. बद्रीनाथ धाममध्ये दोन दिवसांपासून बर्फवृष्टी होत आहे. शुक्रवारी दुपारी बर्फवृष्टीमुळे ग्लेशियर कोसळलं. यामुळे ५७ कामगार बर्फाखाली गाडले गेले. १६ कामगारांना वाचवण्यात यश आले आहे.

प्रशासन आणि बीआरओ टीमला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आपत्ती व्यवस्थापन सचिव विनोद सुमन यांनी सांगितले की, चमोली बद्रीनाथ धाममधील माना गावाजवळील एका ग्लेशियरखाली ५७ कामगार गाडले गेले. १६ जणांना वाचवण्यात यश आले आहे. उर्वरित ४१ कामगारांचा शोध सुरू आहे. दरम्यान, चमोलीचे जिल्हा दंडाधिकारी संदीप तिवारी म्हणाले की, दळणवळण व्यवस्था अत्यंत वाईट स्थितीत असल्याने योग्य माहिती मिळत नाही.

हेही वाचा – भारतीय किरकोळ बाजार 2034 पर्यंत 190 लाख कोटी रुपयांपर्यंत

चमोलीच्या वरच्या भागात गेल्या काही दिवसांपासून जोरदार बर्फवृष्टी होत असल्याचे सांगण्यात येत आहे. हवामान खात्याने आजसाठी आधीच ऑरेंज अलर्ट जारी केला होता. ३२०० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या भागातही बर्फवृष्टीची शक्यता होती. हिमस्खलनाची भीतीही व्यक्त करण्यात आली.

आता, बद्रीनाथ मंदिरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या माना घस्तौलीला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाजवळ हिमस्खलन झाले आहे. हे ठिकाण सुमारे ४००० ते ५००० आहे. ५७ कामगार गाडले गेले आहेत, त्यापैकी १६ जणांना वाचवण्यात यश आले आहे. उत्तराखंडमधील माना गाव भारत आणि चीनच्या सीमेवर आहे. येथे एक आर्मी बेस कॅम्प आहे. म्हणून, सैन्य प्रथम बचाव कार्यात गुंतले आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथके रवाना करण्यात आली आहेत. हिमस्खलनामुळे बीआरओ पथकांनी बचावकार्यही सुरू केले आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment