Gold Silver Price Today : चांदी 75 हजारच्या पुढे..! सोन्याचा भाव किती? ‘हे’ आहेत आजचे रेट!

WhatsApp Group

Gold Silver Price Today : आज, 03 मे 2023 रोजी, भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे. सोन्याचा भाव 61 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत 75 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 61071 रुपये आहे. तर 999 शुद्धतेची चांदी 75,173 रुपये आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, मंगळवारी संध्याकाळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 60417 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो आज सकाळी 61071 रुपयांवर आला आहे. त्याचप्रमाणे शुद्धतेच्या आधारावर सोने-चांदी महाग झाली आहे.

आज सोन्या-चांदीचा भाव किती?

ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, 995 शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याची किंमत आज सकाळी 60,827 रुपये झाली आहे. त्याचवेळी 916 शुद्धतेचे सोने आज 55941 रुपये झाले आहे. याशिवाय 750 शुद्धतेच्या सोन्याचा भाव 45803 पर्यंत खाली आला आहे. त्याचवेळी 585 शुद्धता असलेले सोने महाग होऊन आज 35,726 रुपयांवर पोहोचले आहे. याशिवाय 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीचा दर आज 75173 रुपये झाला आहे.

हेही वाचा – IPL 2023 : विराट कोहली आणि गौतम गंभीरमध्ये काय बोलणं झालं? प्रत्यक्षदर्शीनं केला खुलासा!

मिस्ड कॉलद्वारे जाणून घ्या सोन्या-चांदीची किंमत

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्ट्यांव्यतिरिक्त शनिवार आणि रविवारी ibja द्वारे दर जारी केले जात नाहीत. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. याशिवाय तुम्ही सतत अपडेट्सच्या माहितीसाठी www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment