

Gold Silver Price Today : काही दिवसांपूर्वी सोन्याच्या दरात प्रचंड वाढ झाल्यानंतर आता सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. ऑगस्ट 2020 मध्ये 56,200 चा विक्रम करणाऱ्या सोन्याने मागील काही दिवसात 60,000 चा टप्पा ओलांडला होता. पण आता त्यात घट झाली आहे. येत्या काळात सोने 65,000 रुपयांचा विक्रम करू शकते, असे बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे. गेल्या महिन्यातही फेब्रुवारीच्या अखेरीस सोन्या-चांदीत घसरण झाली होती.
गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीत तेजी
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सोन्याचा दर 55,000 रुपयांपर्यंत खाली आला होता. तसेच 71,000 रुपयांची विक्रमी पातळी गाठलेल्या चांदीचा भावही 61,000 रुपयांवर आला. त्यात गेल्या काही दिवसांपासून तेजी पाहिल्यानंतर आता पुन्हा नरमाईचे वातावरण आहे. जागतिक बाजारातील मंदीच्या काळात सोन्या-चांदीच्या दोन्ही दरात चढ-उतारांचा काळ आहे. दिवाळीत चांदीचा भाव 80,000 रुपये प्रति किलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – तुम्हाला जुनी पेट्रोल-डिझेल गाडी इलेक्ट्रिक करायचीय? किती खर्च येईल? जाणून घ्या!
MCX वर संमिश्र कल
मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर बुधवारी सोने आणि चांदी दोन्हीमध्ये संमिश्र कल दिसून आला. बुधवारी सकाळी सोन्याचा भाव 34 रुपयांच्या घसरणीसह 58579 रुपयांवर होता. तसेच चांदीचा भाव 188 रुपयांनी वाढून 68582 रुपये प्रति किलोच्या पातळीवर पोहोचला. याआधी मंगळवारी सोन्याचा भाव 58579 रुपयांवर आणि चांदीचा भाव 68394 रुपयांवर बंद झाला होता.
सराफा बाजारात चांदीची घसरण, सोने वधारले
सराफा बाजार दर इंडिया बुलियन्स असोसिएशन (https://ibjarates.com) द्वारे दुपारी 12 वाजता जारी केले जातात. मंगळवारी संध्याकाळी 24 कॅरेट सोन्याचा भाव 59188 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आला. त्याच वेळी, चांदीचा भाव जुन्या पातळीवर 68499 रुपये प्रति किलोवर बंद झाला.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!