

Gold Seized At Chennai Airport : सीमाशुल्क विभागाने शुक्रवारी चेन्नई विमानतळावर एका प्रवाशाकडून ४६.२४ लाख रुपये किमतीचे १०३८ ग्रॅम सोने जप्त केले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सोने एका ट्रॉली सूटकेसच्या बाहेरील अस्तरात लपवण्यात आले होते. कर्तव्यदक्ष अधिकारी आरोपीला विमानतळाबाहेर पडण्यापूर्वीच शोधून त्याला अटक करण्यात यशस्वी झाले.
हा प्रवासी श्रीलंकेच्या कोलंबोहून आला होता, सीमाशुल्क विभागाने सूटकेसमधून सोन्याची तार काढतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. याआधी ऑक्टोबरच्या सुरुवातीला, विभागाने विमानतळावर सोन्याच्या तस्करांना मदत केल्याबद्दल एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक केली होती आणि त्याच्याकडून ४३.४१ लाख रुपयांचे सोने जप्त केले होते.
हेही वाचा – IPL 2023 : रवीद्र जडेजाचा CSK संघाला रामराम? समोर आली ‘मोठी’ बातमी
#WATCH | Tamil Nadu: 1038gm of Gold worth Rs 46.24 lakhs concealed in the outer lining of a trolley suitcase was recovered & seized from a passenger from Colombo at Chennai airport: Customs officials
(Source: Customs) pic.twitter.com/F8XFmm8Aoj
— ANI (@ANI) November 4, 2022
वृत्तानुसार, अटक करण्यात आलेला व्यक्ती एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (एआयएएसएल) साठी काम करणारा ग्राहक सेवा एजंट होता. त्याच्या ताब्यातून ९९८ ग्रॅम तस्करीचे सोने जप्त करण्यात आले, अशी माहिती सीमा शुल्क विभागाने माध्यमांना दिली.