

Gujarat : गुजरात सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी भेट देताना बुधवारी मोठा निर्णय घेतला आहे. आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेऊन गुजरातच्या भूपेंद्र पटेल सरकारने सेवानिवृत्ती आणि डेथ ग्रॅच्युइटी लिमिट 25 टक्क्यांनी वाढवून 25 लाख रुपये केली आहे. यापूर्वी गुजरात सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर केवळ 20 लाख रुपयांची कमाल मर्यादा निवृत्ती आणि डेथ ग्रॅच्युटी म्हणून दिली जात होती. सरकारच्या या निर्णयामुळे आता गुजरातमधील सरकारी कर्मचाऱ्यांना 25 लाख रुपयांपर्यंतची ग्रॅच्युइटी मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा गुजरातमधील लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.
गुजरात सरकारच्या या निर्णयानंतर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे ग्रॅच्युइटी मिळणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी वाढवण्याच्या निर्णयामुळे गुजरात सरकारला दरवर्षी 53.13 कोटी रुपये अतिरिक्त खर्च करावे लागणार आहेत. 1 जानेवारी 2024 नंतर निवृत्त होणाऱ्या सर्व गुजरात सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव ग्रॅच्युइटी मर्यादेचा लाभ मिळेल. तथापि, 1 जानेवारी 2024 पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही मर्यादा लागू होणार नाही.
हेही वाचा – नव्या सरकारपूर्वी वर्ल्ड बँकेनं महाराष्ट्राला दिलं 1595 कोटींचं कर्ज, कारण…
आणखी एका निर्णयात, गुजरात सरकारने राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता (DA) मध्ये 3 टक्के वाढ जाहीर केली आहे. या घोषणेमुळे गुजरात सरकारमध्ये काम करणाऱ्या लोकांना आता मूळ पगाराच्या 53टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. 1 जुलै 2024 पासून कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारात डीए वाढवला जाईल. जुलै ते नोव्हेंबरपर्यंतचा थकबाकीदार डीए डिसेंबरच्या पगारासह दिला जाईल. तर जानेवारी 2025 मध्ये पेन्शनधारकांना ते दिले जाईल. डीए वाढवण्याच्या निर्णयामुळे राज्यातील 9 लाखांहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!