

HDFC And ICICI FD Rates : RBI ने ८ फेब्रुवारी रोजी रेपो दरात ०.२५ टक्क्यांनी वाढ केली होती. रेपो दरात वाढ केल्यानंतर देशातील अनेक सरकारी आणि खासगी बँकांनी त्यांच्या मुदत ठेवी (FD) दरात वाढ केली आहे. आता खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँकेने एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे.
ताज्या दरवाढीनंतर, HDFC बँक आता सर्वसामान्यांना ३% ते ७.१०% आणि ज्येष्ठ नागरिकांना ३.५०% ते ७.६०% पर्यंत व्याजदर प्रदान करत आहे. HDFC बँकेच्या FD वरील नवीन व्याजदर २१ फेब्रुवारी २०२३ पासून लागू झाले आहेत.
HDFC बँक एफडी दर
बदलानंतर, HDFC बँक आपल्या ग्राहकांना ७ दिवस ते १४ दिवसांच्या FD वर ३%, १५ ते २९ दिवसांच्या FD वर ३%, ३० ते ४५ दिवसांच्या FD वर ३.५०%, ४६ ते ६० च्या FD वर ४.५०% ऑफर करत आहे. ६१ दिवस ते ८९ दिवसांच्या FD वर दिवस आणि ४.५०% व्याज दिले जाईल. आता बँक ९० दिवसांपासून ६ महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर ४.५०%, ६ महिने १ दिवस ते ९ महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर ५.७५% आणि ९ महिने १ दिवस ते १ वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर ६% व्याज देईल.
हेही वाचा – Mahindra Scorpio : फक्त ५ लाखात खरेदी करा महिंद्रा स्कॉर्पिओ..! ही संधी चुकवू नका
ICICI बँकेने बल्क FD वर वाढवले व्याज
ICICI बँकेने बल्क एफडीवरील व्याजात पुन्हा एकदा वाढ केली आहे. बँकेने एफडीवरील व्याज २ कोटींवरून ५ कोटी रुपये केले आहे. बँकेने यापूर्वी ७ फेब्रुवारी रोजी बल्क एफडीवरील व्याजात वाढ केली होती. यावेळी बँकेने बल्क एफडीवरील व्याजात कमाल ०.२५ टक्के वाढ केली आहे. ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या एफडीवर बँक ४.७५ टक्के ते ७.१५ टक्के व्याज देत आहे. बँक १५ महिन्यांच्या FD वर सर्वाधिक ७.१५% व्याज देत आहे.
ICICI बँक बल्क FD दर
- ७ दिवस ते १४ दिवस : सामान्य लोकांसाठी – ४.७५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ४.७५ टक्के
- १५ दिवस ते २९ दिवस : सामान्य लोकांसाठी – ४.७५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ४.७५ टक्के
- ३० दिवस ते ४५ दिवस : सामान्य लोकांसाठी – ५.५० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ५.५० टक्के
- ४६ दिवस ते ६० दिवस : सामान्य लोकांसाठी – ५.७५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ५.७५ टक्के
- ६१ दिवस ते ९० दिवस : सामान्य लोकांसाठी – ६ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६ टक्के
- ९१ दिवस ते १२० दिवस : सामान्य लोकांसाठी – ६.५० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६.५० टक्के
- १२१ दिवस ते १५० दिवस : सामान्य लोकांसाठी – ६.५० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६.५० टक्के
- १५१ दिवस ते १८४ दिवस : सामान्य लोकांसाठी – ६.५० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६.५० टक्के
- १८५ दिवस ते २१० दिवस : सामान्य लोकांसाठी – ६.६५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६.६५ टक्के
- २११ दिवस ते २७० दिवस : सामान्य लोकांसाठी – ६.६५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६.६५ टक्के
- २७१ दिवस ते २८९ दिवस : सामान्य लोकांसाठी – ६.७५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६.६५ टक्के
- २९० दिवस परंतु एका वर्षापेक्षा कमी : सामान्य लोकांसाठी – ६.७५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६.६५ टक्के
- १ वर्ष ते ३८९ दिवस : सामान्य लोकांसाठी – ७.१५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ७.१५ टक्के
- ३९० दिवस ते १५ महिन्यांपेक्षा कमी : सामान्य लोकांसाठी – ७.१५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ७.१५ टक्के
- १५ महिने ते १८ महिन्यांपेक्षा कमी : सामान्य लोकांसाठी – ७.१५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ७.१५ टक्के
- २ वर्षे १ दिवस ते ३ वर्षे : सामान्य लोकांसाठी – ७ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ७ टक्के
- ३ वर्षे १ दिवस ते ५ वर्षे : सामान्य लोकांसाठी – ६.७५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६.७५ टक्के
- ५ वर्षे १ दिवस ते १० वर्षे : सामान्य लोकांसाठी – ६.७५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६.७५ टक्के
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!