

HDFC IDFC Bank News : खासगी क्षेत्रातील HDFC बँक आणि IDFC First Bank च्या ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. दोन्ही बँकांनी मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) वाढवले आहेत. MCLR वाढल्याने गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्ज महाग होणार आहे. रेपो रेट वाढवल्यानंतर अनेक बँकांनी MCLR वाढवला आहे.
आयडीएफसी फर्स्ट बँकेने कर्ज दर १५-२० बेसिस पॉईंट्सने वाढवले आहेत तर एचडीएफसी बँकेने २०-२५ बेसिस पॉइंट्सने कर्जदरात वाढ केली आहे. HDFC बँकेचे नवीन व्याजदर ७ जानेवारी २०२३ पासून लागू आहेत तर IDFC फर्स्ट बँकेचे दर ८ जानेवारी २०२३ पासून लागू झाले आहेत.
HDFC बँकेचा MCLR दर
HDFC बँकेने एका दिवसासाठी MCLR ८.५० टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. बँकेने १ महिन्यासाठी MCLR ८.५५%, ३ महिन्यांसाठी ८.६०%, ६ महिन्यांसाठी ८.७०%, एका वर्षासाठी ८.८५%, २ वर्षांसाठी ८.९५% आणि ३ वर्षांसाठी ९.०५% केला आहे.
IDFC फर्स्ट बँकेचा MCLR दर
IDFC फर्स्ट बँकेने रात्रीच्या कर्जासाठी MCLR ८.४० टक्क्यांवर वाढवला आहे. MCLR एका महिन्यासाठी ८.४० टक्के, तीन महिन्यांसाठी ८.७० टक्के, ६ महिन्यांसाठी ९.१५ टक्के आणि एका वर्षासाठी ९.५० टक्के करण्यात आला आहे.
हेही वाचा – Metro Recruitment 2023 : महाराष्ट्र मेट्रोमध्ये भरती..! पगार २ लाख रुपये; लगेच करा अर्ज!
तुमचा EMI वाढेल
MCLR वाढल्याने मुदत कर्जावरील EMI वाढण्याची अपेक्षा आहे. बहुतेक ग्राहक कर्जे एका वर्षाच्या किरकोळ खर्चावर आधारित कर्जदरावर आधारित असतात. अशा परिस्थितीत MCLR वाढल्यामुळे वैयक्तिक कर्ज, वाहन आणि गृह कर्ज महाग होऊ शकते.
MCLR म्हणजे काय?
विशेष म्हणजे, MCLR ही भारतीय रिझर्व्ह बँकेने विकसित केलेली एक पद्धत आहे, ज्याच्या आधारे बँका कर्जासाठी व्याजदर ठरवतात. त्याआधी सर्व बँका बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठी व्याजदर निश्चित करत असत.