औषधं बनवणाऱ्या कंपन्या येणार गोत्यात? केंद्र सरकारकडून सर्वात मोठी कारवाई!

WhatsApp Group

Indian Medicines : परदेशात भारतीय औषधांवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर केंद्र सरकारने मोठे निर्णय घेणे सुरू केले आहेत. औषधांच्या गुणवत्तेबाबत शासनाकडून तपासणी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. गेल्या 6 महिन्यांत देशातील 134 औषध कंपन्यांची तपासणी करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सरकारने सर्वात मोठी कारवाई केली आहे. आतापर्यंत हिमाचल प्रदेशातील 26 कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 11 कंपन्यांवर स्टॉप प्रोडक्शन ऑर्डर लागू करण्यात आली असून दोन फार्मा कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या उच्च अधिकृत सूत्रांनी सांगितले की, परदेशात भारतीय औषधांवर प्रश्न उपस्थित झाल्यापासून, DCGI आणि राज्य औषध नियामकाने उत्पादनाची गुणवत्ता तपासण्यासाठी तपासणी मोहीम तीव्र केली आहे. आतापर्यंत 134 औषध कंपन्यांची तीन वेगवेगळ्या टप्प्यात तपासणी करण्यात आली आहे.

हेही वाचा – दिवसा वीज स्वस्त, रात्री महाग! मोदी सरकार ‘मोठं’ पाऊल उचलण्याच्या तयारीत

यामध्ये गेल्या तीन वर्षांपासून राज्यांमधून नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी ड्रग (NSQ) औषध उत्पादनाचा रेकॉर्ड असलेल्या कंपन्यांच्या नावांचा डेटा तयार करण्यात आला होता. 2019-22 मध्ये 11 पेक्षा जास्त वेळा NSQ (Not of standard Quality Drug) मध्ये अयशस्वी झालेल्या कंपन्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

  • उत्तराखंड : 22
  • मध्य प्रदेश : 14
  • गुजरात : 9
  • दिल्ली : 5
  • तामिळनाडू : 4
  • पंजाब : 4
  • हरयाणा : 3
  • राजस्थान : 2
  • कर्नाटक : 2

पश्चिम बंगाल, तेलंगणा, पुद्दुचेरी, केरळ, जम्मू, सिक्कीम, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशमध्ये 1-1 औषधी कंपन्यांची तपासणी करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशातील 26 युनिट्सना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment