

Hero MotoCorp Price Hike : भारतातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी म्हणून Hero MotoCorp ओळखली जाते. आता या कंपनीने मोठी घोषणा केली आहे. ही की कंपनी 1 एप्रिल 2023 पासून त्यांच्या लाइन-अप (मोटारसायकल आणि स्कूटर) च्या किमती वाढवेल. पुढील महिन्यापासून हिरोची निवडक उत्पादने 2 टक्क्यांपर्यंत महाग होतीलमॉडेल आणि बाजारपेठेनुसार दरवाढ बदलू शकते. अशा परिस्थितीत हिरोच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाईक स्प्लेंडरच्या किमतीही वाढू शकतात, त्याच्या किमती जास्तीत जास्त 2 टक्क्यांनी वाढू शकतात. हिरोच्या पोर्टफोलिओमधील हे सर्वात महत्त्वाचे उत्पादन आहे.
Hero MotoCorp च्या मते, OBD-II नियमांची पूर्तता करण्यासाठी केलेले बदल हे किमती वाढण्याचे मुख्य कारण आहे. एका अधिकृत निवेदनात, कंपनीने म्हटले आहे की, “OBD-II संक्रमणामुळे किंमती वाढल्यामुळे किंमतींमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. Hero MotoCorp ग्राहकांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी नाविन्यपूर्ण वित्तपुरवठा उपाय ऑफर करत राहील.”
निवेदनात पुढे म्हटले आहे की, “सामाजिक क्षेत्रातील सरकारी योजना आणि चांगले कृषी उत्पादन यामुळे ग्रामीण बाजारपेठेत मागणी वाढली आहे. हे उद्योगासाठी चांगले आहे कारण विकासाची गती आगामी सणासुदीच्या हंगामापर्यंत टिकून राहण्याची अपेक्षा आहे.”
हेही वाचा – Startups : स्टार्टअपसाठी पेसै पाहिजेत? ‘इथून’ मिळेल 700 कोटींची फंडिंग!
Hero MotoCorp ने अलीकडेच भारतात ऑल न्यू झूम 110 (Xoom 110) लाँच केले आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 68,599 रुपये आहे. ही एक वैशिष्ट्यपूर्ण स्कूटर आहे. होंडा अॅक्टिव्हा एच-स्मार्ट आणि टीव्हीएस ज्युपिटर यांसारख्या स्कूटरशी त्याची स्पर्धा आहे. कंपनीने सुपर स्प्लेंडरचा नवीन हाय-टेक XTEC प्रकार देखील सादर केला आहे. 83,368 एक्स-शोरूम किंमतीत, यात एलईडी हेडलॅम्प, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर इत्यादी वैशिष्ट्ये आहेत.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!