मानवी त्वचेचा टेडी बिअर? अमेरिकेत भयानक दृश्य पाहून पोलिसही हादरले!

WhatsApp Group

Human Skin Teddy Bear : अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एका पेट्रोल पंपाजवळ असलेल्या बस स्टॉपजवळ एक विचित्र आणि भयावह टेडी बिअर आढळून आला, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. Bear Valley Road परिसरात रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या या टेडी बिअरची बॉडी बघून असं वाटत होतं की ती मानवी त्वचेसारख्या चमड्याने बनवलेली आहे.

 पोलीस आणि स्थानिक नागरिक धास्तावले!

या टेडी बिअरवर अशी काही सामग्री चिकटवलेली होती की ती खऱ्या माणसाच्या त्वचेसारखी दिसत होती. बॉडीवर त्वचा ओढून पिनने लावलेली होती, जी अत्यंत भयानक आणि अस्वस्थ करणारी वाटत होती. त्यामुळे पोलिसांनी लगेचच या घटनेची चौकशी सुरू केली.

फॉरेन्सिक तपासात काय निष्पन्न झालं?

शुरुवातीला हा प्रकार अत्यंत गूढ वाटत होता. पण फॉरेन्सिक पॅथॉलॉजिस्टच्या तपासणीनंतर स्पष्ट झालं की ही सामग्री मानवी त्वचा नव्हती. कोणताही human tissue यामध्ये आढळला नाही. हे केवळ आर्टिफिशियल लेटेक्स आणि रंगांचं बनावट मिश्रण होतं, ज्याने खऱ्या त्वचेचा भास निर्माण केला होता.

हेही वाचा –तत्काळ तिकीटासाठी नवा नियम! IRCTC चा मोठा निर्णय, जाणून घ्या काय बदललं?

 हे भीतीदायक खेळणं नेमकं कोण करतंय तयार?

या टेडी बिअरबाबत चौकशी करताना समोर आलं की हे Etsy नावाच्या वेबसाइटवरून विकत घेतलेलं आहे, जिथे हे ‘मानवी त्वचेसारखं’ असं मार्केटिंग करून विकलं जातं. हे उत्पादन साउथ कॅरोलिनामधील कलाकार रॉबर्ट कैली याने तयार केलं होतं.

रॉबर्ट कैली हे “Dark Seed Creations” नावाने काम करतात आणि ते अशा प्रकारचे डार्क, हॉरर आर्ट पीसेस तयार करतात. ते लेटेक्स, रबर आणि विशेष रंग वापरून मानव त्वचेचा लुक तयार करतात आणि त्यांच्या कलाकृतींमध्ये गिटार, सोफा, टेडी बिअर सुद्धा आहेत.

पोलीस पुढील कारवाई करणार का?

स्थानिक पोलिसांनी या टेडी बिअरला ताब्यात घेतलं असून, अजूनही स्पष्ट नाही की या प्रकरणात फार पुढील चौकशी होईल की नाही. तथापि, या घटनेनंतर एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे — अशा भयावह आणि मानसिक धक्का देणाऱ्या आर्टवर्कची सार्वजनिक ठिकाणी विक्री व प्रदर्शन कितपत सुरक्षित आहे?

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment