Champions Trophy : पाकिस्तानला धक्का, भारताच्या आक्षेपानंतर आयसीसीचा ‘मोठा’ निर्णय

WhatsApp Group

Champions Trophy : पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पाकिस्तानमध्ये होणार आहे. याबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) स्पर्धेची ट्रॉफी पाकिस्तानला पाठवली आहे. ही ट्रॉफी गुरुवारी (14 नोव्हेंबर) इस्लामाबादमध्ये पोहोचली. मात्र यादरम्यान पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. ते ही ट्रॉफी पाकव्याप्त काश्मीरला (पीओके) पाठवू शकणार नाहीत.

पाकिस्तान सरकारने एक योजना तयार केली होती की ट्रॉफी 16 ते 24 नोव्हेंबर दरम्यान पाकिस्तानभर नेली जाईल. ही ट्रॉफी जगातील दुसऱ्या क्रमांकाचे पर्वत शिखर K2 वर देखील नेले जाईल.

हेही वाचा – देशाच्या 18% लोकसंख्येला एक ओळही लिहिता-वाचता येत नाही, 20% लोकांना बेरीज-वजाबाकी माहीत नाही!

ही ट्रॉफी पाकव्याप्त काश्मीर (पीओके), स्कार्दू, मुरी आणि मुझफ्फराबाद या तीन शहरांमध्ये नेण्याचा निर्णयही घेण्यात आला. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) आक्षेपानंतर आयसीसीने याची दखल घेतली आहे. तसेच ही ट्रॉफी यापुढे पीओकेमध्ये जाणार नाही, असा आदेशही पाकिस्तानला देण्यात आला आहे.

वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment