Tax कमी दाखवलात? होऊ शकतो 200% दंड आणि 7 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा!

WhatsApp Group

Income Tax Penalty : जर तुम्ही आयकर रिटर्न (ITR) भरताना तुमचं उत्पन्न जाणीवपूर्वक किंवा चुकून कमी दाखवत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. आयकर विभाग आता अधिक सतर्क झाला असून, कोणत्याही प्रकारची Tax चोरी किंवा चुकीची माहिती दिल्यास 200% पर्यंत दंड आणि 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.

आय कमी दाखवली तर किती दंड?

आयकर अधिनियमाच्या कलम 270A नुसार, उत्पन्न कमी दाखवल्यास (Under-reporting of Income), बचावलेल्या कराच्या 50% पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.

उदाहरण

जर एखाद्या व्यक्तीने ₹2 लाख उत्पन्न लपवले आणि त्यावर ₹60,000 कर भरायचा होता, तर त्याला ₹30,000 दंड भरावा लागू शकतो.

जाणूनबुजून चुकीची माहिती दिली तर?

जर तुम्ही जाणूनबुजून चुकीचे बिल्स, बनावट खर्च किंवा खोटे कागदपत्र वापरलेत, तर हे गंभीर गुन्हा मानला जातो. अशा स्थितीत, कलम 270A अंतर्गत बचावलेल्या कराच्या 200% पर्यंत दंड आकारला जातो.

उदाहरण

₹60,000 चा कर लपवला, तर ₹1,20,000 पर्यंत दंड लागू शकतो.

Tax चोरी सिद्ध झाली तर जेल होऊ शकते

जर Tax चोरी मुद्दाम केली गेली आणि ती रक्कम ₹25 लाखांपेक्षा जास्त असेल, तर आयकर विभाग तुमच्यावर गुन्हा दाखल करू शकतो.

कलम 276C नुसार शिक्षा:
3 महिने ते 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास

आयकर विभाग तुमची माहिती कशी तपासतो?

सध्याचा IT विभाग AI आधारित सिस्टम वापरतो. त्यामुळे तुम्ही जे ITR मध्ये देता तेच पाहिले जात नाही, तर तुमचं :

  • AIS (Annual Information Statement)
  • फॉर्म 26AS
  • बँक ट्रान्झॅक्शन
  • GST रिटर्न
  • क्रेडिट कार्ड खर्च
  • मालमत्ता खरेदी-विक्री

हे सगळं डेटा तपासलं जातं. या डेटामध्ये कोणतीही विसंगती आढळली, तर तुमचा केस तपासासाठी निवडला जातो.

टाळा ही महागडी चूक!

  • उत्पन्न लपवू नका
  • बनावट बिल वापरू नका
  • खर्चाचे योग्य पुरावे द्या
  • ITR भरताना तज्ज्ञ सल्ला घ्या
  • AIS आणि फॉर्म 26AS तपासा

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment