

Monkeypox in Delhi : दिल्लीत मंकीपॉक्स विषाणूचा पाचवा रुग्ण आढळला आहे. येथील लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात (LNJP हॉस्पिटल) दाखल झालेल्या महिलेचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या महिलेला खूप ताप आणि हातात पुरळ आल्यानं LNJP रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. महिलेची प्रकृती सध्या स्थिर आहे. दिल्लीतील ही दुसरी महिला आहे, ज्यामध्ये मंकीपॉक्सचा संसर्ग झाल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय दिल्लीत आढळून आलेले मंकीपॉक्सचे इतर तीन रुग्ण पुरुष आहेत. दिल्लीतील मंकीपॉक्सच्या पहिल्या रुग्णाला सोमवारी LNJP रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
ही माहिती देताना हॉस्पिटलचे एमडी डॉ. सुरेश कुमार म्हणाले, ”LNJP हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला दाखल करण्यात आलं होतं. त्याच्या नमुन्याच्या तपासणीत मंकीपॉक्सचा संसर्ग आढळून आला आहे. डॉक्टरांचं पथक त्यांच्यावर उपचार करत आहे.” यासोबतच त्यांनी सांगितलं, की दिल्लीतील मंकीपॉक्स संसर्गाची ही पाचवी घटना आहे. सध्या LNJP हॉस्पिटलमध्ये मंकीपॉक्सचे एकूण चार रुग्ण दाखल आहेत, तर एक व्यक्ती पूर्णपणे बरी होऊन घरी गेली आहे.
Delhi reports 5th monkeypox patient
A patient was admitted in LNJP & her sample tested positive for monkeypox y'day. At present, 4 patients are admitted, 1 discharged. Total 5 cases have yet been reported here. Team of doctors is treating her: Dr Suresh Kumar, MD LNJP hospital pic.twitter.com/8mzmTB23Y2
— ANI (@ANI) August 13, 2022
हेही वाचा – खरंच मंकीपॉक्स विषाणू कोरोनापेक्षाही धोकादायक आहे का?
दिल्लीत मंकीपॉक्सचे नवीन रुग्ण आढळल्यानंतर आता देशात या संसर्गाची लागण झालेल्यांची संख्या १० झाली आहे. त्याच वेळी, जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) नुकतीच मंकीपॉक्स जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केली आहे.
मंकीपॉक्स कसा पसरतो?
मंकीपॉक्स हा प्राण्यांपासून होणारा आजार आहे, याचा अर्थ असा होतो की तो प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरतो. त्यामुळं मंकीपॉक्सनं जिथं आपलं स्थान निर्माण केलं आहे, तिथं तो प्राण्यांच्या माध्यमातून मानवांना संक्रमित करतो. मंकीपॉक्सचा प्रसार माकड आणि लंगूर, गिलहरी, उंदीर आणि उंदीर यांसह अनेक प्राण्यांमधून होऊ शकतो. परंतु याचा अर्थ असा नाही की ज्या देशांमध्ये हे प्राणी आढळत नाहीत तेथे हा विषाणू आपलं स्थान बनवू शकत नाही.
मंकीपॉक्स रोखण्यासाठी सध्या अवलंबल्या जात असलेल्या आरोग्य उपायांमध्ये संक्रमित व्यक्तींना क्वारंटाइन करणं, संक्रमित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेणं आणि जास्त धोका असलेल्यांना लसीकरण करणं यांचा समावेश आहे. मंकीपॉक्स बद्दलचा पुरावा असं सांगतो, की लोक या आजारातून २८ दिवसात बरे होऊ शकतात आणि २१ दिवसात या विषाणूवर मात देखील करू शकतात.
हेही वाचा – ऐकलं का..? पुढच्या वर्षीपासून जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर होणार बंद!
दिल्लीत मास्क घालणं अनिवार्य
दिल्लीत कोरोनाच्या वाढत्या केसेसच्या पार्श्वभूमीवर कोविडच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. पुन्हा, मास्कची आवश्यकता काटेकोरपणे अंमलात आणण्यासाठी आणि त्याचं उल्लंघन करणार्यांना ५०० रुपये दंड ठोठावण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याच्या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.