भारत सरकारचा मोठा निर्णय! 5 वर्षांनंतर चिनी नागरिकांना पुन्हा व्हिसा देणार

WhatsApp Group

India China Tourist Visa 2025 : भारत सरकारने अखेर पाच वर्षांनंतर चिनी नागरिकांसाठी टुरिस्ट व्हिसा पुन्हा सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 24 जुलै 2025 पासून ही प्रक्रिया अधिकृतपणे सुरू होणार असल्याची माहिती बीजिंगमधील भारतीय दूतावासाने दिली आहे.

कोविडमुळे बंद झाली होती सेवा

मार्च 2020 मध्ये कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर भारताने सर्व पर्यटक व्हिसा तात्पुरते स्थगित केले होते. विशेषतः चीनमधील वाढत्या संसर्गामुळे चिनी नागरिकांसाठी व्हिसा सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. जवळपास 5 वर्षांनी आता ही बंदी हटवण्यात आली आहे.

व्हिसासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रं

भारतीय दूतावासाने स्पष्ट केलं आहे की, बीजिंगमधील भारतीय व्हिसा केंद्रात पासपोर्ट परत घेण्यासाठी अर्ज करताना ‘पासपोर्ट विड्रॉल लेटर’ अनिवार्य असेल.

2020 मध्ये गलवान खोऱ्यात भारत-चीन सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीनंतर दोन्ही देशांमधील प्रवास व संपर्क जवळपास थांबले होते. यानंतर चीनने काही भारतीय विद्यार्थ्यांना व व्यापाऱ्यांना व्हिसा देण्यास सुरुवात केली होती, मात्र सामान्य प्रवासावर बंधन कायम होते.

गलवाननंतर भारत-चीन संबंध तणावात

गलवान खोऱ्याच्या घटनेनंतर भारत-चीन संबंध 1962 नंतर सर्वात तणावपूर्ण झाले होते. मात्र पुढील काही वर्षांत दोन्ही देशांमध्ये अनेक दौऱ्यांची चर्चा झाली. यामध्ये पॅंगॉंग लेक, गलवान आणि हॉट स्प्रिंग्स परिसरातून लष्कर मागे घेण्यावर सहमती झाली होती. ऑक्टोबर 2024 मध्ये देपसांग आणि डेमचोक भागातूनही सैन्य हटवण्याचा करार झाला.

हेही वाचा – ‘झिरो फिगर’चं वेड! १६ वर्षाच्या मुलीचं जीवघेणं डाएटिंग; ICUमध्ये १२ तास मृत्यूशी झुंज

यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची रशियातील कझान येथे महत्त्वपूर्ण भेट झाली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध नव्याने उभारण्यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले.

परस्पर संबंध वाढवण्यावर भर

भारत आणि चीन आता लोकांमधील संपर्क वाढवण्याच्या दिशेने काम करत आहेत. यामध्ये स्ट्रेट फ्लाइट्स पुन्हा सुरू करणे आणि कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याचा विचार आहे. ही यात्रा कोविडमुळे बंद करण्यात आली होती.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी देखील म्हटलं आहे की, “भारत-चीन संबंध आता हळूहळू योग्य दिशेने वाटचाल करत आहेत.”

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment