

Indian Air Force Recruitment 2023 : तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. भारतीय वायुसेनेत अनेक पदांसाठी भरती निघाली आहे. याद्वारे 327 पदांवर भरती होणार आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला अधिकृत वेबसाइट https://afcat.cdac.in/AFCAT/ वर जावे लागेल.
महत्वाची तारीख
या पदासाठी 1 डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर आहे.
किती पदांची भरती?
या पदाद्वारे 327 पदांवर भरती होणार आहे. त्याद्वारे फ्लाईंग, टेक्निकल, नॉन टेक्निकल, एंट्री आणि इतर विभागांमध्ये भरती केली जाणार आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान 20 वर्षे असावे. तर 24 वर्षांवरील उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकत नाहीत. परंतु जर तुम्ही ग्राउंड ड्युटी किंवा तांत्रिक पदांसाठी अर्ज केला तर तुम्हाला वयोमर्यादेत काही सूट दिली जाईल.
हेही वाचा – शाळेच्या बाईंना आयडिया आली आणि त्यांनी 330 कोटींची कंपनी उभारली!
अर्जाची फी
या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 250 रुपये भरावे लागतील. एनसीसी स्पेशल आणि मेट्रोलॉजी पदांसाठी अर्जासाठी शुल्कात सूट आहे.
पगार
या पदांवर भरतीसाठी, तुम्हाला 56,100 रुपये ते 1,77,500 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.
याप्रमाणे अर्ज करा
- एअर इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://afcat.cdac.in/AFCAT/ वर जा.
- येथे मुख्यपृष्ठावर तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकासह नोंदणी करावी लागेल.
- यानंतर तुम्हाला तुमचा तपशील फॉर्ममध्ये भरावा लागेल.
- सर्व तपशील भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- यानंतर पेमेंट करा आणि फॉर्म सबमिट करा.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!