पोलिसांचा गोळीबार, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू! काय घडलं इतकं भयंकर की जीव गमवावा लागला?

WhatsApp Group

Indian Engineer Shot Dead In US : अमेरिकेतील कॅलिफोर्नियात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतातील तेलंगाणाचा रहिवासी आणि संगणक अभियंता मोहम्मद निजामुद्दीन याला अमेरिकन पोलिसांनी थेट गोळ्या झाडून ठार केल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना 3 सप्टेंबर रोजी घडली असून, यामागे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

नेमकं काय घडलं?

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या अहवालानुसार, सांता क्लारा येथील पोलिसांना 911 वर एका चाकूबाजीची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहचल्यावर, पोलिसांना एक व्यक्ती चाकू घेऊन उभी असल्याचं दिसलं. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, त्या व्यक्तीने आदेश न पाळल्यामुळे त्याच्यावर गोळीबार करण्यात आला.

पोलिसांनी ज्या व्यक्तीवर गोळीबार केला तोच मोहम्मद निजामुद्दीन होता. त्याला चार गोळ्या झाडण्यात आल्या. घटनास्थळी त्याचा रूममेट गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे अमेरिकेतील परदेशी नागरिकांवरील वागणूक आणि पोलीस कारवाईवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

निजामुद्दीनची पार्श्वभूमी काय होती?

मोहम्मद निजामुद्दीनने फ्लोरिडामधून कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्सची पदवी प्राप्त केली होती. त्यानंतर त्याने कॅलिफोर्नियातील एका खासगी कंपनीत नोकरी स्वीकारली होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी त्याला अचानक नोकरीवरून काढून टाकण्यात आले. त्यानंतर त्याने LinkedIn वर पोस्ट करत आरोप केला की, त्याला नोकरीतून अन्यायपूर्वक काढून टाकण्यात आले आणि त्याच्या वेतनात फसवणूकही झाली.

हेही वाचा – इंडिगोच्या संचालक मंडळात मोठा बदल! अमिताभ कांत यांची ‘विशेष’ नेमणूक

इतकेच नाही, तर निजामुद्दीनने काही वेळापूर्वीच सार्वजनिकरित्या वर्णद्वेष, मानसिक त्रास आणि बेरोजगारीबाबत चिंता व्यक्त केली होती. या सर्व घटनांमुळे त्याच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाला होता का, याचा तपास करण्याची गरज आहे.

कुटुंबाची वेदना आणि मदतीची याचना

ही दुःखद बातमी भारतात पोहोचल्यानंतर निजामुद्दीनच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. त्याचे वडील मोहम्मद हसनुद्दीन आणि इतर नातेवाईकांशी मजलिस बचाओ तहरीकचे प्रवक्ते अमजद उल्लाह खान यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

अमजद यांनी भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहून पार्थिव शरीर भारतात आणण्यासाठी तातडीने मदत मागितली आहे. तसेच, या घटनेची गंभीर आणि पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणीही केली आहे.

वर्णद्वेष आणि मानसिक आरोग्याचा धोकादायक संगम?

निजामुद्दीनने गोळी लागण्यापूर्वीच स्वतःच्या मानसिक आरोग्याची, नोकरी गमावण्याची, आणि वर्णद्वेषाच्या अनुभवांची अनेक वेळा सोशल मीडियावर चर्चा केली होती. या पार्श्वभूमीवर ही घटना केवळ पोलिस कारवाई नसून, एका युवकाच्या संपूर्ण संघर्षमय जीवनाचा त्रासदायक शेवट होता, असंही म्हटलं जातंय.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment