IOCL Recruitment 2023 : इंडियन ऑइलमध्ये जॉब..! १०६ जागांसाठी भरती; ‘असा’ करा अर्ज!

WhatsApp Group

IOCL Recruitment 2023 : इंडियन ऑइलने (Indian Oil) संस्थेतील १०६ कार्यकारी पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. IOCL ची ही भरती एक कंत्राटी भरती आहे जी काही काळासाठी करारावर असेल. IOCL च्या या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया २८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे, इच्छुक उमेदवार अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मार्च २०२३ पर्यंत अर्ज करू शकतील. इच्छुक उमेदवार IOCL च्या iocl.com या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

IOCL भरतीच्या महत्त्वाच्या तारखा :

  • ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख – २८-०२-२०२३
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२-०३-२०२३

रिक्त पदांचा तपशील :

IOCL च्या या भरती मोहिमेत एकूण १०६ पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड करायची आहे. यापैकी ९६ पदे लेव्हल-१ एक्झिक्युटिव्ह आणि १० पदे लेव्हल-२ कार्यकारी पदांसाठी आहेत.

हेही वाचा – PAN Card : तारीख जवळ येतेय..! ३१ मार्चपर्यंत करा ‘हे’ काम, नाहीतर करावा लागेल पश्चात्ताप

वयोमर्यादा :

कार्यकारी स्तर-१ पदांसाठी ३५ वर्षे आणि स्तर-२ पदांसाठी कमाल ४५ वर्षे.

असा करा अर्ज :

  • उमेदवार अधिकृत वेबसाइट www.iocl.com ला भेट देतात.
  • होम पेजवर दिसणार्‍या करिअर टॅबवर क्लिक करा.
  • अर्ज संबंधित भरती लिंकवर क्लिक करा.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज फी जमा करा.
  • अर्ज सबमिट करा आणि अर्जाची प्रिंटआउट घ्या.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment