बॉलिवूडचा ‘हॉलिवूड’ हिरो हृतिक रोशन करतोय दुसरं लग्न?

WhatsApp Group

मुंबई : बॉलिवूडचा ‘हॉलिवूड’ हिरो हृतिक रोशन ४८ वर्षांचा झाला असला तरी तो फिटनेसमध्ये नवनवीन कलाकारांना मात देतोय. इतकंच नाही तर त्याच्या रिलेशनशिपमुळं अनेकदा चर्चेत असतो. हृतिक त्याच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान असणाऱ्या सबा आझादला डेट करतोय. अभिनेत्री-गायक सबा आझादसोबत ह्रतिकला स्पॉट केलं जातं. आता या दोघांच्या लग्नाच्या चर्चेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे. हृतिकनं सुझैन खानसोबत १४ वर्षे सुखी वैवाहिक जीवन घालवले. हे दोघे सुमारे आठ वर्षांपूर्वी वेगळे झाले होते. दोघे विभक्त झाले असले, तरीही त्यांच्या मुलांसाठी हृदान आणि रिहानसाठी एकमेकांसोबत दिसतात. हृतिक अनेकदा सबा आझाद, तर सुझैन खान तिचा बॉलफ्रेंड अर्सलान गोनीसोबत वेळ घालवताना दिसतात. एवढेच नाही तर सबा आणि सुझैनची चांगली बॉन्डिंग आहे.

हृतिक रोशन आणि सबा आझाद एकमेकांसोबत स्पॉट झाले आहेत. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांच्या फोटोंचे कौतुक करत असतात. दोघेही एकमेकांसोबत खूश आहेत, एकत्र हॉलिवूडला जातात. असं म्हटलं जात आहे की ते एकमेकांबद्दल खूप गंभीर आहेत. तथापि, अभिनेत्याने सबासोबतच्या नात्याबाबत कधीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही. हृतिकच्या लग्नाच्या प्लॅनिंगबाबत, इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे की, सबा आणि हृतिकला लग्नाची घाई नाही. दोघेही फक्त एकमेकांच्या सहवासाचा आनंद लुटत आहेत.

काही महिन्यांपूर्वी मुंबईतील एका हॉटेलबाहेर हृतिक-सबा एकत्र दिसले. तेव्हापासून या दोघांमध्ये काहीतरी असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर हे दोघे करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये हातात हात घालून पोज देताना दिसले. सबा अनेकदा हृतिकच्या कुटुंबीयांसह दिसते.

ह्रतिक करतोय लग्न?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रसिद्ध दिवंगत ज्योतिषी बेजान दारूवाला यांनी हृतिक रोशनबद्दल भाकीत केलं, होतं की ह्रतिक दुसरं लग्न करेल. सुझैनसोबतचं नातं संपुष्टात आल्यावर त्यांनी हे सांगितलं होतं. आता बेजान दारूवाला या जगात नसले तरी त्यांची भविष्यवाणी खरी ठरणार की नाही, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे. सध्या तरी सबा किंवा हृतिकनं असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे कळते.

‘विक्रम वेधा’मध्ये दिसणार हृतिक!

हृतिक रोशन लवकरच ‘विक्रम वेधा’ या चित्रपटातून पुन्हा पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटात हृतिकसोबत सैफ अली खान आणि राधिका आपटे देखील महत्त्वाच्या भूमिकेत असतील. गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाचं बजेट आणि शुटिंग लोकेशन याबाबत अनेक प्रकारच्या बातम्या समोर आल्या.

Leave a comment