जीप आणणार फक्त 10 लाखात शक्तिशाली SUV..! ब्रेझ्झा आणि नेक्सॉनला मागे टाकणार?

WhatsApp Group

Jeep New SUV in India : अमेरिकन कार कंपनी जीप आगामी काळात परवडणाऱ्या सब-4 मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्येही आपली नवीन गाडी आणू शकते. जीपने भारतीय बाजारपेठेत कंपास आणि मेरिडियनसह इतर शक्तिशाली SUV लाँच केल्या. आता जीपच्या आगामी एसयूव्हीचे नाव जीपस्टर असू शकते. मात्र, कंपनीने याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. जीपची आगामी एसयूव्ही मारुती सुझुकी ब्रेझा, टाटा नेक्सॉन, ह्युंदाई व्हेन्यू आणि महिंद्रा एक्सयूव्ही300 यासह इतर लोकप्रिय एसयूव्हीशी स्पर्धा करेल.

जीपच्या आगामी सब-4 मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या लूकबद्दल बोलायचे झाल्यास, यात एलईडी हेडलॅम्प आणि टेललॅम्प्स, एलईडी डीआरएल, अलॉय व्हील्स आणि ब्लॅक क्लॅडिंगसह कंपनीचे सिग्नेचर 7-स्लॅट ग्रिल पाहायला मिळेल. ही एसयूव्ही स्पोर्टी दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी मेड इन इंडिया एसयूव्ही म्हणून त्याची जाहिरात करू शकते, ज्यामध्ये 90 टक्के घटक स्थानिक असतील.

हेही वाचा – Upcoming Cars : जून 2023 पर्यंत मार्केटमध्ये येणार ‘या’ 10 गाड्या..! वाचा लिस्ट

या कारमध्ये चांगले काय?

जीपच्या आगामी एसयूव्ही जीपस्टरच्या फीचर्सबद्दल बोलताना, यात वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्ले सपोर्टसह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस चार्जर, प्रीमियम सीट्स, क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक एसी आणि मल्टीपल एअरबॅगसह इतर आवश्यक मानक आणि सुरक्षितता फीचर्स पाहायला मिळतील.

इंजिन पॉवर आणि अपेक्षित किंमत

जीपच्या आगामी सब-4 मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये 1.2-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन दिसू शकते, जे 100bhp पर्यंत पॉवर निर्माण करण्यास सक्षम असेल. या SUV मध्ये ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) सिस्टीम दिसू शकतात. जीपस्टर 10 लाख रुपयांपर्यंतच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केली जाऊ शकते.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment