पूर आला, कोर्ट बुडालं… पण नाव घेऊन न्याय द्यायला पोहोचले ‘शूर’ जज साहेब!

WhatsApp Group

Flooded Court Hearing : जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या भीषण पुरामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनंतनागमधील जिल्हा न्यायालयाचा परिसर पूर्णपणे जलमय झाला असतानाही, मुख्य जिल्हा न्यायाधीश ताहिर खुर्शीद रैना यांनी नाव घेऊन कोर्ट गाठलं आणि महत्त्वाची सुनावणी घेतली.

न्यायालयीन कामकाज ठप्प

अनंतनाग जिल्हा न्यायालयाच्या परिसरात पूराचं पाणी भरल्यामुळे, न्यायालयीन कामकाज ठप्प झालं आहे. कोर्टाच्या खोल्या, कार्यालयं आणि रेकॉर्ड रूमपर्यंत पाणी पोहोचलेलं आहे. अशा बिकट परिस्थितीतही, न्यायाधीश ताहिर खुर्शीद रैना यांनी हार न मानता नावद्वारे कोर्ट परिसरात पोहोचण्याचा निर्धार केला.

पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना

कोर्टात दाखल होताच त्यांनी तत्काळ रिमांड आणि जामिनाच्या अर्जांवर निर्णय घेण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. त्यांनी जलमय झालेल्या परिसराचा स्वतः दौरा करत न्यायालयीन रेकॉर्डची सुरक्षितता सुनिश्चित केली.

हेही वाचा – LIC पॉलिसी घेताना ‘ही’ एक चूक ठरू शकते जीवघेणी! सुप्रीम कोर्टाचा निर्णय, एकही रुपया मिळाला नाही!

जज म्हणाले….

बार अँड बेंच या न्यायिक वेबसाईटशी बोलताना जज रैना म्हणाले, “प्राकृतिक आपत्ती आली असली तरीही न्याय देणं थांबता कामा नये. संकटसमयी न्यायपालिका पुढाकार घेतली पाहिजे. कोर्ट बुडालं असेल, पण न्याय नाही.”

जज रैना यांच्यासोबत मुख्य न्यायदंडाधिकारी फिरोज अहमद खान हे देखील नावेतून कोर्टात दाखल झाले होते. न्यायालयाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं की, नियमित सुनावण्या सध्या स्थगित करण्यात आल्या आहेत. मात्र, अर्जंट प्रकरणे व रेकॉर्ड्सची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

अनंतनाग कोर्टात कार्यरत असलेल्या एका वकिलाने सांगितलं की, “मुख्य न्यायाधीश नावेतून कोर्टात पोहोचले, हा प्रसंग संपूर्ण न्यायव्यवस्थेच्या समर्पणाचं प्रतीक ठरला आहे. पूर आल्यानंतरही त्यांनी न्यायाच्या सेवा थांबू दिल्या नाहीत, हे खरोखर प्रेरणादायी आहे.”

भारतीय वायुसेना रेस्क्यूसाठी सज्ज

पूरामुळे जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी लँडस्लाइड झाले असून रस्ते खचले आहेत. त्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत होते. या पार्श्वभूमीवर आता भारतीय वायुसेनादेखील पुढे आली आहे.

रेस्क्यूसाठी वायुसेनेनं पाच MI-17 हेलिकॉप्टर आणि एक चिनूक हेलिकॉप्टर सक्रिय केले असून, पूरग्रस्त भागांमध्ये अडकलेल्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम सुरू आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment