

Kerala Auto Driver Lottery : केरळचा रिक्षाचालक क्षणार्धात करोडपती झाला आहे. श्रीवरहम येथील अनूप नावाच्या एका रिक्षाचालकानं ओणम बंपर लॉटरीत २५ कोटी रुपये जिंकले आहेत. लॉटरीमध्ये २५ कोटी रुपये जिंकल्यानंतर अनूपच्या आनंदाला पारावार उरला नाही. ऑटो चालक म्हणून काम करण्यापूर्वी अनूप एका हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करायचा. पैसे कमावण्यासाठी तो मलेशियाला जाण्याच्या तयारीत होता. याशिवाय त्यानं बँकेकडून कर्जही घेतलं होतं. पण त्याच्या नशिबात वेगळंच काही लिहिलं होतं. ओणमची बंपर लॉटरी जिंकल्यानंतर तो आता करोडपती झाला आहे.
अनूपनं शनिवारी रात्री भगवती एजन्सीमधून लॉटरीचं तिकीट खरेदी केलं होतं आणि रविवारी त्याला २५ कोटींचं बक्षीस जाहीर करण्यात आलं. केरळचे अर्थमंत्री केएन बालगोपाल यांनी परिवहन मंत्री अँटोनी राजू आणि वट्टीयुरकावूचे आमदार व्हीके प्रशांत यांच्या उपस्थितीत लकी ड्रॉ काढला ज्यामध्ये अनूपनं २५ कोटी रुपयांची लॉटरी जिंकली. अनूपनं सांगितलं, की सर्वप्रथम तो या पैशातून आपलं घर बांधणार आहे आणि त्याच्यावर जे काही कर्ज आहे ते फेडणार आहे.
हेही वाचा – अरे बापरे..! बुलेटच्या आवाजानं म्हैस बिथरली आणि होत्याचं नव्हतं झालं; पाहा व्हायरल VIDEO
Kerala: Auto driver wins Rs 25 crore Onam bumper lottery
Read @ANI Story | https://t.co/EOIh3CC77N #Onam #Lottery #Kerala #AutoDriver pic.twitter.com/8xyy74hoNg
— ANI Digital (@ani_digital) September 19, 2022
या वर्षीची ओणमची बंपर किंमत केरळ लॉटरीच्या इतिहासात सर्वाधिक होती. ओणम बंपर किंमतीचे पहिलं बक्षीस २५ कोटी रुपये, दुसरं बक्षीस ५ कोटी रुपये आणि तिसरं बक्षीस १० जणांसाठी १ कोटी रुपये होते. लॉटरी तिकीट क्रमांक TJ-750605 सह अनूपनं पहिलं बक्षीस जिंकलं. कर कपात केल्यानंतर आपल्याला १५ कोटी ७५ लाख रुपये मिळतील, असं अनूपनं सांगितलं. विशेष म्हणजे, यावर्षी ६७ लाख ओणमची बंपर तिकिटं छापण्यात आली आणि जवळपास सर्व तिकिटं विकली गेली. तिकीटाची किंमत ५०० रुपये होती. लॉटरी हे केरळ सरकारच्या उत्पन्नाचं मुख्य स्त्रोत आहेत.
#Kerala's Auto Driver Won Rs 25 Crores in Lottery.
#Kerala #LotteryTicket #Thiruvandanathpuram #PrizeMoney #Lottery #OnamBumper2022 pic.twitter.com/7i4pF3DBpF
— Harish Deshmukh (@DeshmukhHarish9) September 19, 2022
ओणम हा राजा महाबली यांच्या सुशासनाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. ओणम हा कापणीचा सण प्रामुख्याने मल्याळी लोकांकडून साजरा केला जातो.