लय भारी..! आली Kia ची ७ सीटर इलेक्ट्रिक कार; लूकच्या बाबतीत ठरतेय एक नंबर!

WhatsApp Group

Kia EV9 Electric : दक्षिण कोरियाची कार निर्माता कंपनी Kia ने अखेर आपली Kia EV9 इलेक्ट्रिक SUV कारचे अनावरण केले आहे. काही काळापूर्वी, त्याचे कॉन्सेप्ट व्हर्जन भारतात ऑटो एक्सपो २०२३ मध्ये दाखवण्यात आले होते. आता कंपनीने उत्पादन मॉडेल सादर केले आहे. Kia ची ही सर्वात मोठी इलेक्ट्रिक SUV असल्याचा कंपनीचा दावा आहे. Kia EV9 ची बहुतेक बाह्य रचना कॉन्सेप्ट व्हर्जनसारखेच आहे, आतील भाग पूर्णपणे पुन्हा डिझाइन केले गेले आहेत.

कारची डिझाइन 

मोबाईल गेममध्ये टँकसारखी दिसणारी Kia EV9 ची रचना ‘टायगर नोज’ ग्रिल, एलईडी लाईट मॉड्यूल्स, Z-आकाराचे हेडलॅम्प आणि ब्लॅक-आउट पॅनल्ससह करण्यात आली आहे. गाडीच्या खिडकीचा काचा एका मोठ्या ग्लासहाऊससारख्या दिसतात.

परिमाणांच्या बाबतीत, Kia EV9 ची लांबी ४९२९ मिमी, रुंदी २०५५ मिमी आणि उंची १७९० मिमी आहे, ज्यामुळे तो टोयोटा फॉर्च्युनरपेक्षा लांब आणि रेंज रोव्हर सारखाच आहे. याचा व्हीलबेस ३१०० मिमी आहे, जो इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्युलर प्लॅटफॉर्म (E-GMP) वर सर्वात लांब आहे.

हेही वाचा – Share Market : १२ रुपयाचा शेअर गेला १२०० वर..! ‘या’ फार्मा कंपनीने लोकांना केलं मालामाल; जाणून घ्या!

कारच्या डॅशबोर्डमध्ये १२.३-इंचाचा ड्युअल स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. हे ड्रायव्हर डिस्प्ले आणि इन्फोटेनमेंट सिस्टमसह एकत्रित केले आहे. डॅशबोर्ड अगदी आधुनिक आहे आणि स्टीयरिंगवर नियंत्रणे बसवली आहेत. कंपनी याला ६ आणि ७ सीटर पर्यायांमध्ये आणणार आहे.

Kia EV9 संकल्पनेमध्ये ट्विन-स्क्रीन इन्फोटेनमेंट लेआउट, स्पोक-लेस स्टीयरिंग व्हील आणि सभोवतालची प्रकाश व्यवस्था आहे. यात ३-पंक्ती लेआउट आहे आणि तुम्ही दुसऱ्या रांगेच्या जागा १८० अंशांनी फिरवू शकता. तिसर्‍या रांगेतील प्रवाशांना कप होल्डर आणि चार्जिंग पोर्ट सारख्या सुविधाही देण्यात आल्या आहेत.

सध्या, त्याच्या बॅटरी पॅकबद्दल कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही, परंतु असे मानले जाते की याला ७७.४kWh क्षमतेचा बॅटरी पॅक मिळेल, जो सुमारे २० मिनिटांत १० टक्के ते ८० टक्के वेगाने चार्ज होऊ शकतो. सध्या ही एसयूव्ही भारतात लॉन्च होण्याची शक्यता नाही.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment