

मुंबई : 5G स्पेक्ट्रमचा लिलाव सुरू झाला आहे. यामध्ये जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल सहभागी झाले आहेत. तीन दूरसंचार कंपन्यांशिवाय अदानींच्या अदानी डेटा नेटवर्क्सनंही या लिलावात भाग घेतला आहे. त्यांच्या समावेशामुळं स्पेक्ट्रमच्या किमतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्याच वेळी, सामान्य वापरकर्त्यांसाठी 5G चे फायदे काय आहेत यावर बरीच चर्चा झाली आहे. वापरकर्ता म्हणून 5G सेवा वापरण्यासाठी तुम्हाला किती पैसे खर्च करावे लागतील? हा एक मोठा प्रश्न आहे. 5G सेवेची योजना आणि किंमत अद्याप जाहीर केलेली नाही. लिलाव संपल्यानंतर कंपन्या याबद्दल तपशील देतील.
5G सेवा कधी उपलब्ध होईल?
तशी, कोणतीही निश्चित तारीख जाहीर केलेली नाही. परंतु अनुमानांबद्दल बोलताना, सेवा ऑक्टोबरपर्यंत लाइव्ह होईल. दूरसंचार कंपन्यांनी यापूर्वीच 5G च्या चाचणी बँडवर स्पीड चाचण्या केल्या आहेत. लिलाव पूर्ण झाल्यानंतर आणि स्पेक्ट्रम वाटप झाल्यानंतर सर्वसामान्यांना ही सेवा मिळणार आहे. ऑक्टोबरपर्यंत सर्वजण 5G वापरत असतील, असा अंदाज आहे.
5G spectrum auction begins online. Reliance Jio, Adani Group, Bharti Airtel, and Vodafone Idea are the four major participants in the auction.
— ANI (@ANI) July 26, 2022
4G ची किंमत किती आहे?
जिओचा ८४ दिवसांचा दररोज २ GB डेटा असलेला प्लॅन सध्या ७१९ रुपयांममध्ये येतो. त्याच वेळी, एअरटेलचा प्लॅन ८३९ रुपयांचा आहे. व्होडाफोन-आयडियाचा प्लान देखील ७१९ रुपयांचा आहे, ज्यामध्ये यूजर्सला दररोज १.५ GB डेटा मिळतो. तिन्ही प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएस फायदे देखील उपलब्ध असतील. काही अतिरिक्त फायदे देखील आहेत, जे सर्व ब्रँडपेक्षा वेगळे आहेत.
हेही वाचा – Kargil Vijay Diwas 2022 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचं पहिलं…
5G ची किंमत किती असेल?
5G सेवेची किंमत किती असेल याबाबत नेमकी माहिती सध्या उपलब्ध नाही. पण टेलिकॉम कंपन्यांवर विश्वास ठेवला तर 4G च्या तुलनेत या सेवेसाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. एअरटेलचे सीटीओ रणदीप सेखोन यांनी भारतातील 5G ची किंमत उदाहरणासह स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं होतं, की 5G सेवा उपलब्ध असलेल्या इतर बाजारपेठांमध्ये 4G च्या तुलनेत ग्राहकांना कोणतेही प्रीमियम शुल्क भरावं लागत नाही. म्हणजेच 5G सेवेसाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. होय, हे निश्चितपणे 4G पेक्षा थोडं अधिक महाग असेल, परंतु ते प्रीमियम किंमतीवर येणार नाही. तज्ञांनी दिलेल्या संकेतांनुसार, भारतात 5G प्लॅन आणणं सध्याच्या 4G प्लॅनपेक्षा १० ते १२ टक्के जास्त महाग असू शकतं.