ITR Filing : फॉर्म 16 शिवाय भरता येतो इन्कम टॅक्स रिटर्न..! जाणून घ्या

WhatsApp Group

File ITR Without Form 16 : आर्थिक वर्ष 2023-24 सुरू झाले आहे. अशा परिस्थितीत आता प्रत्येक आयकर भरणाऱ्याला त्याचे आयकर रिटर्न (ITR) भरावे लागणार आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे. ई-फायलिंग पोर्टलवर आयटीआर फाइल करण्यासाठी तुमच्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड, फॉर्म 16, बँक खात्याचे तपशील आणि इतर उत्पन्नाचे पुरावे असणे आवश्यक आहे. एवढेच नाही तर आयटीआर फाइल करण्यासाठी पॅन आणि आधार लिंक असणे आवश्यक आहे. तुमचा ई-मेल आयडी देखील आयकर विभागाकडे नोंदणीकृत असावा. परंतु, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की काही प्रकरणांमध्ये पगारदार व्यक्ती फॉर्म 16 शिवाय देखील ITR दाखल करू शकते.

फॉर्म 16 हा असा दस्तऐवज आहे ज्याद्वारे कर्मचाऱ्याला संपूर्ण करपात्र उत्पन्नाचा हिशोब मिळतो. काही कर्मचाऱ्यांचे वेतन आयकराच्या कक्षेत येत नाही. अशा परिस्थितीत कंपनी त्यांच्यासाठी फॉर्म 16 जारी करत नाही. अशा परिस्थितीत, जर त्या कर्मचाऱ्यांना ITR भरायचा असेल तर ते फॉर्म 16 शिवाय देखील करू शकतात.

हेही वाचा – चमत्काराला नमस्कार..! मृत्यूच्या 2 तासानंतर पुन्हा जिवंत झाला तरुण; डॉक्टरही हैराण

फॉर्म 16 म्हणजे काय?

प्राप्तिकर भरण्यासाठी फॉर्म 16 हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. या दस्तऐवजात, व्यक्तीच्या संपूर्ण उत्पन्नाचा लेखाजोखा असतो. यावरून त्या व्यक्तीने एकूण किती पैसे खर्च केले, किती कर कापला आहे हे कळते. आर्थिक वर्षात कापलेल्या टीडीएसची माहितीही नोंदवली जाते आणि गुंतवणुकीचीही माहिती असते. आयकर नियम सांगतात की, कंपनीने कर्मचाऱ्याच्या पगारातून टीडीएस कापला तर त्याला टीडीएस प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.

फॉर्म 26AS

तुमच्याकडे फॉर्म 16 नसल्यास, तुम्ही फॉर्म 26AS च्या मदतीने सहजपणे ITR दाखल करू शकता. फॉर्म 26AS मध्ये TDS आणि TCS बद्दल माहिती आहे. यासोबतच त्या व्यक्तीचा अॅडव्हान्स टॅक्स आणि उच्च मूल्याच्या व्यवहारांचा तपशीलही आहे. यामध्ये दिलेल्या तपशिलांसह तुमची सॅलरी स्लिप, एचआरए स्लिप, आयकर कलम 80C आणि 80D अंतर्गत केलेल्या गुंतवणुकीचा पुरावा देखील आवश्यक असेल. जर तुम्ही गृहकर्ज घेतले असेल तर त्याचा पुरावा देखील ITR भरताना द्यावा लागेल. या सर्वांच्या मदतीने तुम्ही फॉर्म 16 शिवायही आयकर रिटर्न भरू शकता.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment