Bhaubeej 2022 : भाऊबीज उद्या की परवा? ‘इथं’ दूर करा कन्फ्युजन!

WhatsApp Group

Bhaubeej 2022 : भाऊबीज हा सण दरवर्षी कार्तिक महिन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. यंदा दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज सूर्यग्रहण होणार आहे. त्यामुळे भाऊबीज तिथीबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे कारण दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गोवर्धन उत्सव साजरा केला जात नसून, सूर्यग्रहणामुळे २६ ऑक्टोबरला गोवर्धन उत्सव साजरा केला जाणार आहे. अशा परिस्थितीत लोकांच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहेत की भाऊबीजचा सण कोणत्या दिवशी साजरा होणार? २६ किंवा २७ ऑक्टोबर?

यावर्षी कार्तिक पक्षाची दुसरी तिथी २६ आणि २७ ऑक्टोबर या दोन दिवशी आहे. भाऊबीज २६ ऑक्टोबर रोजी २.४३ वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी २७ ऑक्टोबर रोजी १२.४५ मिनिटे चालेल. तर २६ रोजी भावाला टिळक करण्याचा शुभ मुहूर्त १२.१४ ते दुपारी १२.४७ पर्यंत असेल.

२७ ऑक्टोबर रोजी भाऊबीजचा शुभ मुहूर्त

उदया तिथीनुसार २७ ऑक्टोबरला भाऊबीजचा सणही साजरा केला जाणार आहे. या दिवशी भावाला ओवाळण्याचा शुभ मुहूर्त सकाळी ११.०७ ते १२.४६ पर्यंत असणार आहे.

हेही वाचा – Whatsapp Down : व्हॉट्सॲपला लागलं ग्रहण..! अचानक बंद पडलं आणि व्हायरल झाले मीम्स; पाहा!

भाऊबीज का साजरी करतात?

धर्मग्रंथानुसार यम द्वितीया म्हणजेच भाऊबीजच्या दिवशी दुपारी यमराज आपल्या बहिणीच्या घरी आले आणि बहिणीने त्यांची पूजा केली, त्यानंतर यमराजांनी बहिणीच्या घरी भोजन केले. या पूजेच्या आशीर्वादात यमराजांनी आपली बहीण यमुना हिला वरदान देताना सांगितले की, भाऊबीजच्या दिवशी जे भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जाऊन तिची पूजा स्वीकारतील आणि तिच्या घरी भोजन करतील त्यांचा अकाली मृत्यू होणार नाही.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment