बॉलिवूड, हॉलिवूड किंवा अवॉर्ड शोमध्ये ‘रेड कार्पेट’ का असते? त्याचा इतिहास काय?

WhatsApp Group

कुठलाही अवॉर्ड शो म्हणा किंवा सेलिब्रिटींचा कार्यक्रम म्हणा तिथे रेड कार्पेट (Red Carpet) असतंच. नुकताच कान्स चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाच्या निमित्ताने रेड कार्पेटवर बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्रींनी आपली जादू पसरवली. जेव्हा जेव्हा विशेष पाहुण्यांचे स्वागत केले जाते तेव्हा तेथे रेड कार्पेट अंथरले जाते. रेड कार्पेट नेहमीच खास लोकांशी जोडले गेले आहे. हे असे का आहे? कोणत्याही देशाचा मंत्री किंवा पाहुणे भारताच्या राजनैतिक दौऱ्यावर आले तरी त्याच्या स्वागतासाठी रेड कार्पेट अंथरले जाते. त्या कार्पेटचा रंग काळा, पिवळा किंवा अगदी निळा का नसतो?

रेड कार्पेटचा इतिहास

रेड कार्पेटचा इतिहास ग्रीक नाटक अॅगामेमनॉनशी जोडलेला आहे. यात खास लोकांसाठी रेड कार्पेटचा वापर केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे. बीबीसीच्या एका लेखात म्हटल्याप्रमाणे, लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमचे क्युरेटर सॉनेट स्टॅनफिल म्हणतात की रेड कार्पेट हे राजे आणि सम्राटांशी संबंधित आहे. 1821 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेम्स मनरो कॅलिफोर्नियातील जॉर्जटाउन येथे आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी रेड कार्पेट अंथरण्यात आले.

हेही वाचा – आजचे राशीभविष्य : ‘या’ राशीच्या लोकांना आज गजकेसरी योगातून कमाई आणि लाभाची संधी!

1922 मध्ये, रॉबिन हूड चित्रपटाच्या प्रीमियरसाठी इजिप्शियन थिएटरसमोर एक लांब रेड कार्पेट पसरला होते. यानंतर, स्टार्सची एक खास परेड आयोजित करण्यात आली होती, जी खूप पसंत केली गेली. 1961 मध्ये अकादमी पुरस्कार सोहळ्यात पहिल्यांदा रेड कार्पेटचा वापर करण्यात आला आणि तो खास बनवण्यात आला. त्याचप्रमाणे, हळूहळू विशेष लोकांसाठी रेड कार्पेट नेहमीचे ठरले.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment