नेपाळमध्ये महाभयंकर गोंधळ! राष्ट्रपतींच्या घरावर हल्ला, संसद जळाली, संतप्त जमावाची घरात घुसून तोडफोड

WhatsApp Group

Nepal Social Media Ban Protest : नेपाळमध्ये सध्या मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. देशाचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे आणि राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी तो स्वीकारलाही आहे. या निर्णयामुळे देशात अस्थिरतेचं वातावरण अधिकच गडद झालं असून आता नेपाळच्या लष्कराकडून सत्ता आपल्या हातात घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान ओली यांना नेपाळच्या लष्कराकडून थेट सत्ता सोडण्याचा इशारा मिळाला होता. लष्कराचे म्हणणे होते की, “जर तुम्ही सत्ता सोडली नाही, तर देशात नियंत्रण ठेवणे अशक्य होईल.”

दुबई पलायनाचा आरोप

या सर्व गोंधळात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे – पंतप्रधान ओली देश सोडून दुबईला जाण्याच्या तयारीत होते. काही तासांमध्येच देशात परिस्थिती इतकी बिघडली की, राष्ट्रपतींच्या निवासस्थानावरच संतप्त जमावाने हल्ला केला.

या निदर्शनात राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या निवासस्थानी घुसून तोडफोड केली गेली व नंतर आग लावण्यात आली. इतकंच नव्हे तर नेपाळच्या संसद भवनालाही जाळण्यात आलं.

हेही वाचा – कॅन्सर झाल्याचं कळल्यानंतर मी तासन् तास रडलो…

हिंसाचाराचा भडका, मंत्र्यांचे राजीनामे

या हिंसक आंदोलनात आतापर्यंत पाच मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या मुख्यालयावर जमावाने कब्जा केला असून, माओवादी नेते आणि माजी पंतप्रधान पुष्प कमल दहाल ‘प्रचंड’ यांच्या घरावरही हल्ला करून आग लावण्यात आली आहे.

पंतप्रधान ओली यांचे आवाहन

या सगळ्या पार्श्वभूमीवर के.पी. ओली यांनी देशवासियांना शांती राखण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी देशाला उद्देशून भाषणात म्हटलं:

“राजधानी व इतर भागांत जे निदर्शने झाली आणि त्यानंतर जी हिंसक कृत्ये घडली, त्याचा मला दुःख आहे. हिंसा देशाच्या हितासाठी कधीच योग्य नाही. आम्ही शांततेच्या मार्गाने संवादातून मार्ग शोधण्याच्या भूमिकेत आहोत. मी आज संध्याकाळी ६ वाजता सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहे. मी देशवासीयांना नम्र आवाहन करतो की या कठीण काळात शांत राहावे.”

विरोधाचे खरे कारण काय?

या सर्व परिस्थितीमागे एकच ठळक कारण आहे – नेपाळ सरकारने सोशल मीडिया बॅन करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारने एकाच वेळी 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला.

हा निर्णय काही काळाने मागे घेण्यात आला असला, तरी तोपर्यंत देशात अस्थिरता आणि आक्रमक आंदोलन पेटून उठले होते. परिणामी, पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment