VIDEO : ‘केसरिया’ गाण्याचं मराठी व्हर्जन ऐकलं का? पुणेकरानं केलाय ‘नादखुळा’ प्रयोग!

WhatsApp Group

मुंबई : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या सगळ्यांना उत्सुकता लागून राहिलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील ‘केसरिया’ हे पहिलं गाणं नुकतंच रिलीज झालं. रणबीर-आलिया यांच्या लग्नाच्या प्रसंगी या गाण्याची थोडीशी झलक सर्वांसमोर आणण्यात आली होती, त्यानंतर संपूर्ण हिंदी गाणी ऐकणारे रसिक या संपूर्ण गाण्याची वाट पाहत होते. आता आख्खं गाणं रिलीज झाल्यानंतर त्याची चर्चा सर्वत्र आहे. आतापर्यंत या गाण्याचा व्हिडिओ यूट्यूबवर दोन कोटींहून अधिक वेळा पाहिला गेलाय.

मराठीत केसरिया!

आता सगळ्यात भारी म्हणजे केसरियाचं मराठी व्हर्जन आलं आहे. आणि हे मराठी व्हर्जन गायलंय श्रेयस देशपांडे यानं. पुण्याच्या श्रेयसनं सुमधूर पद्धतीनं हे गाण बनवलं असून या गाण्याचे बोलही उत्तम आहेत. यूट्यूबवर ४ हजारांहून अधिक सब्स्क्रायबर्स असणाऱ्या श्रेयसच्या या गाण्याला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळतोय. श्रेयसनं स्वत: हे गाणं लिहिल असून ते स्वतःच्या आवाजात हे रेकॉर्ड केलंय.

‘केसरिया’ हे गाणं अरिजित सिंगनं अतिशय सुंदर पद्धतीनं गायलं आहे. याचं सुरेख संगीत प्रीतम यांनी दिलं आहे आणि त्याचं गीत प्रसिद्ध गीतकार अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिलं आहे, जे थेट लोकांच्या हृदयात जाऊन भिडतं. २ मिनिट ५२ सेकंदाचं हे गाणं ईशा आणि शिव यांच्या प्रेमकथेबद्दल आहे, कारण ते वाराणसीच्या आध्यात्मिक ठिकाणी एकमेकांवरील प्रेमाची कबुली देतात.

केसरिया गाण्यावर चोरीचा आरोप

केसरिया गाणं थोडं संकटात सापडलं आहे. या गाण्यावर चोरीचे आरोप होऊ लागले आहेत. हे गाणं अनेक गाण्यांची कॉपी असल्याचं नेटकऱ्यांना वाटतंय. ‘चरखा’ या राजस्थानी गाण्याचा व्हिडिओ ट्वीट करत एका यूजरनं लिहिलं, ‘प्रीतमनं पुन्हा एकदा कॉपी केली आहे का? त्याच वेळी, दुसर्‍या यूजरनं २००७ मध्ये अभय देओलच्या ‘एक चालिस की लास्ट लोकल’ चित्रपटातील ‘क्या हुआ जो लारी छुटी’ या लोकप्रिय गाण्याचा व्हिडिओ शेअर करत म्हटलं ‘इतकी कॉपी करू नका.’

कधी होतोय रिलीज ‘ब्रह्मास्त्र’?

अयान मुखर्जीचा बहुप्रतिक्षित ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. जवळपास सात वर्षांपूर्वी जाहीर झालेल्या या चित्रपटाचा पहिला भाग अखेर ९ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्याशिवाय या चित्रपटात अमिताभ बच्चन, नागार्जुन अक्किनेनी आणि मौनी रॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Leave a comment