

Maruti Suzuki Recalls : तुम्हीही मारुती सुझुकीची कार वापरत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. मारुती सुझुकीच्या कारमध्ये सुरक्षेशी संबंधित समस्या समोर आली आहे, ज्यामुळे कंपनीने मोठ्या प्रमाणात कार परत मागवल्या आहेत. मारुती सुझुकी इंडियाने बुधवारी सांगितले की त्यांनी सदोष एअरबॅग तपासण्यासाठी आणि बदलण्यासाठी Alto K10, Brezza आणि Baleno मॉडेलची १७,३६२ वाहने परत मागवली आहेत. देशातील सर्वात मोठ्या कार निर्मात्याने शेअर बाजाराला सांगितले की प्रभावित मॉडेल्समध्ये अल्टो K10, S-Presso, Eeco, Brezza, Baleno आणि Grand Vitara यांचा समावेश आहे.
ज्या कारमध्ये ही समस्या असू शकते त्यांची निर्मिती ८ डिसेंबर २०२२ ते १२ जानेवारी २०२३ दरम्यान करण्यात आली होती. कंपनीने सांगितले की, ‘या वाहनांमधील एअरबॅग कंट्रोलर तपासणीसाठी आणि गरज पडल्यास बदलण्यासाठी मोफत काढण्यात येत आहे.’ मारुती सुझुकीने सांगितले की, बाधित भागात दोष असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे वाहन अपघात झाल्यास एअरबॅग आणि सीट बेल्ट प्रीटेन्शनर योग्यरित्या काम करू शकत नाहीत.
हेही वाचा – Tata Nexon EV Price : टाटा मोटर्सचा धमाका..! Nexon EV कारची किंमत झाली कमी; वाचा!
Maruti Suzuki India is recalling 17,362 units of models like Alto K10, Brezza and Baleno to inspect and replace a faulty airbag controller.#MarutiSuzuki https://t.co/CpHFpm8sY8
— Business Standard (@bsindia) January 18, 2023
निवेदनात असेही म्हटले आहे की संशयित वाहनांच्या ग्राहकांना प्रभावित भाग बदलेपर्यंत अत्यंत सावधगिरीने वाहन चालवू नका. बाधित वाहन मालकांनी त्वरित लक्ष वेधण्यासाठी कंपनीच्या अधिकृत कार्यशाळेशी संपर्क साधावा. याशिवाय बाधित वाहनधारकांशीही कंपनीकडूनच संपर्क साधला जाणार आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!