

Mukesh Ambani : आशियातील आघाडीचे उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी दिवाळीपूर्वी 37 लाख शेअरधारकांना मोठी भेट देणार आहेत. मुकेश अंबानी यांनी बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. कंपनीच्या बोनस शेअर्ससाठी 28 ऑक्टोबर ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच दिवाळीपूर्वी गुंतवणूकदारांना गिफ्ट मिळणार आहे. रेग्युलेटरी फाइलिंगमध्ये दिलेल्या माहितीत कंपनीने सांगितले की, कंपनीला बोनस शेअर्स देण्यास भागधारकांकडून मंजुरी मिळाली आहे.
स्टॉक एक्स्चेंजकडे नियामक फाइलिंगमध्ये, रिलायन्स इंडस्ट्रीजने सांगितले की त्यांना 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स जारी करण्यासाठी भागधारकांकडून मंजुरी मिळाली आहे. कंपनीने सांगितले की, बोनस शेअर्स मिळण्याचा हक्क असलेल्या भागधारकांना निश्चित करण्यासाठी सोमवार 28 ऑक्टोबर 2024 ही रेकॉर्ड तारीख निश्चित करण्यात आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 29 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली होती. तर 5 सप्टेंबर 2025 रोजी कंपनीच्या बोर्डाने बोनस शेअर्स देण्यास मान्यता दिली होती.
हेही वाचा – IND vs NZ : विराट कोहलीच्या नावावर ‘झिरोवर आऊट’ होण्याचा रेकॉर्ड!
HDFC सिक्युरिटीजने RIL वर ‘ADD’ रेटिंगसह 3,350 रुपयांची लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. त्याचवेळी नोमुराने RIL ला 3,450 रुपयांचे लक्ष्य दिले आहे आणि त्याला बाय रेटिंग देखील दिले आहे. CLSA ने 3,300 रुपयांच्या लक्ष्यासह स्टॉकवर आपले ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग कायम ठेवले आहे. UBS ने RIL वर Rs 3,250 चे ‘बाय’ रेटिंग कायम ठेवले आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!