

Mukesh Ambani’s Daughter Blessed With Twins : उद्योगपती मुकेश अंबानी आजोबा झाले आहेत. त्यांची मुलगी ईशा अंबानीने १९ नोव्हेंबर रोजी जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. ईशाचे लग्न उद्योगपती अजय आणि स्वाती पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल यांच्याशी झाले. ईशाने एक मुलगी आणि एका मुलाला जन्म दिला आहे. मुलीचे नाव आदिया आणि मुलाचे नाव कृष्णा आहे.
ईशा आणि आनंद १२ डिसेंबर २०१८ रोजी लग्नाच्या बंधनात अडकले. ईशा ही मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची एकुलती एक मुलगी आहे. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी त्यांनी वडिलांना रिलायन्सचा व्यवसाय हाताळण्यास मदत करण्यास सुरुवात केली. ऑक्टोबर २०१४ मध्ये त्यांना रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स जिओच्या बोर्डावर स्थान देण्यात आले. २०२० मध्येच मुकेश अंबानी आजोबा झाले. आकाश अंबानीची पत्नी श्लोका मेहता हिने १० डिसेंबरला मुलाला जन्म दिला.
हेही वाचा – Video : बिहारमध्ये भरधाव ट्रकनं ७ मुलांसह १५ जणांना चिरडलं; मोदींनी व्यक्त केला शोक
Many congratulations to Isha & Anand on becoming proud parents of Aadiya and Krishna. Heartiest wishes to elated grandparents Sh Mukesh Ambani, Smt Nita Ambani, Sh Ajay Piramal and Smt Swati Piramal. #IshaAmbani #MukeshAmbani #NitaAmbani pic.twitter.com/swCoib9QFm
— Parimal Nathwani (@mpparimal) November 20, 2022
आनंद पिरामल यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात बॅचलर पदवी आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्याचबरोबर ईशाने स्टॅनफोर्ड विद्यापीठातून बॅचलर डिग्री घेतली आहे. ईशाने तिचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून केले.
फोर्ब्सने २०१८ मध्येच ईशा अंबानीची संपत्ती ७० मिलियन डॉलर्स असल्याचा अंदाज वर्तवला होता. रिलायन्स ग्रुपमध्ये वडिलांना मदत करण्यापूर्वी ईशानेही काम केले होते. मॅकिन्से अँड कंपनीमध्ये व्यवसाय विश्लेषक म्हणून त्यांनी न्यूयॉर्कमध्ये काही काळ काम केले.