Mutual Fund गुंतवणुकीत नवा ट्रेंड! आता गुंतवणूकदार ‘ही’ युक्ती वापरून मिळवतायत मोठा परतावा

WhatsApp Group

Mutual Fund Investment Trend : म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या जगतात सध्या मोठा बदल घडताना दिसतोय. मागील 18 महिन्यांत ‘डायरेक्ट प्लान’मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या सवयींमध्ये मोठा बदल झालाय. Business Standard च्या अहवालानुसार, आता अधिकाधिक गुंतवणूकदार गुंतवणूक सल्लागार (Investment Advisors) आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस (PMS) प्रदात्यांच्या मदतीने ‘डायरेक्ट प्लान’मध्ये गुंतवणूक करत आहेत. याउलट, स्वखुशीनं गुंतवणूक करणाऱ्या DIY (Do It Yourself) गुंतवणूकदारांची गती काहीशी कमी झाली आहे.

डायरेक्ट प्लान म्हणजे काय? कोणते आहेत गुंतवणुकीचे दोन मार्ग?

म्युच्युअल फंडचे डायरेक्ट प्लान म्हणजे असे प्लान्स जिथे एखादा गुंतवणूकदार थेट फंड हाऊसकडे जातो, कोणत्याही एजंटशिवाय. अशा प्लान्समध्ये गुंतवणूक करण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत:

  1. DIY गुंतवणूकदार: जे स्वतः संशोधन करून कोणती स्कीम निवडायची हे ठरवतात. हे कोणताही सल्ला घेत नाहीत आणि कोणतीही फी देत नाहीत.
  2. सल्लागार व PMS मार्ग: यामध्ये गुंतवणूकदार प्रोफेशनल सल्लागारांकडून किंवा PMS प्रदात्यांकडून मार्गदर्शन घेतात. यासाठी ठराविक फी भरावी लागते, पण निर्णय अधिक माहितीपूर्ण असतो.

हेही वाचा – ICC ODI Rankings 2025 : वनडेमध्ये स्पिनर्सचा दबदबा! केशव महाराज बनला जगातील नंबर-1 गोलंदाज

आकडे काय सांगतात?

2024 च्या जानेवारीपासून आतापर्यंतच्या कालावधीत, डायरेक्ट प्लानमध्ये सल्लागार किंवा PMS प्रदात्यांच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यांच्या मालमत्तेमध्ये (AUM) तब्बल 64-65% वाढ झाली आहे. त्याचवेळी DIY गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत केवळ 47% वाढ झाली आहे. एकूणच डायरेक्ट प्लानमध्ये 41% ची वाढ नोंदवण्यात आली आहे.

याचा अर्थ, गुंतवणूकदार आता अधिक सुरक्षित आणि माहितीपूर्ण मार्ग निवडत आहेत – मार्गदर्शन घेऊन गुंतवणूक करणे हा नव्या युगाचा ट्रेंड बनतोय.

का वाढतेय सल्लागारांची मागणी?

गेल्या काही काळात शेअर बाजारातील चढ-उतार आणि परताव्यातील अनिश्चिततेमुळे नवखे तसेच अनुभवी गुंतवणूकदार सल्ल्याच्या शोधात आहेत. सल्लागार आणि PMS प्रदाते बाजारातील चढ-उतार समजावून देतात, आणि गुंतवणूक थांबवण्याऐवजी योग्य सल्ला देतात. परिणामी, गुंतवणूकदार घाईघाईत निर्णय घेत नाहीत आणि त्यांची गुंतवणूक दीर्घकालीन लाभ देण्यास सक्षम होते.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment